Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

सुंदर आणि स्वच्छ नखे आपली सुंदरता वाढवण्याचे काम करतात. परंतु, बर्‍याचदा हातांनी वारंवार अन्न खाल्ल्याने आणि पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे नखे पिवळी दिसू लागतात.

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
नखांचे आरोग्य
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 2:39 PM

मुंबई : सुंदर आणि स्वच्छ नखे आपली सुंदरता वाढवण्याचे काम करतात. परंतु, बर्‍याचदा हातांनी वारंवार अन्न खाल्ल्याने आणि पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे नखे पिवळी दिसू लागतात. याशिवाय, बाजारात मिळणाऱ्या स्वस्त नेल पेंट वापरणे किंवा जास्त काळ नेल पेंट नखांवरून न काढणे, यामुळे देखील आपली नखे पिवळी होऊ शकतात. अशावेळी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन, तिथले मॅनीक्योरचे महागडे उपचार घ्यायचे नसल्यास, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही नखांचा पिवळेपणा दूर करू शकता (Best home remedies to get rid of yellow nails).

लिंबू

लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे, ज्यामुळे नखे नैसर्गिकरित्या चमकदार बनू शकतात. यासाठी, आपल्याला लिंबामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालावा लागेल. या दोन गोष्टी एकत्र मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा. ब्रशच्या सहाय्याने ही पेस्ट आपल्या नखांवर लावा. किमान 10 मिनिटे ही पेस्ट नखांवर राहू द्या आणि नंतर नखे स्वच्छ पाण्याने धुवा.

पांढरे व्हिनेगर

यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा पांढरे व्हिनेगर आणि एक कप कोमट पाणी एकत्र मिसळा. यानंतर, कोमट पाण्यात हात 10 मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा. सुती कापडाने नखे स्वच्छ केल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावा (Best home remedies to get rid of yellow nails).

टूथपेस्ट

टूथपेस्ट आपले दात पांढरे ठेवते, तसेच नखे उजळ करण्यास देखील मदत करते. यासाठी आपल्याला आपल्या नखांवर टूथपेस्ट लावावी लागेल आणि दोन्ही हातांच्या नखे ​​एकमेकांवर घासावी लागतील. ही क्रिया केल्यानंतर किमान 5 मिनिटांनी हात पाण्याने स्वच्छ धुवा.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव तेल हे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त नखांच्या आरोग्यासाठी देखील ते चांगले आहे. झोपेच्या आधी दररोज रात्री नखांवर आणि बोटांवर ऑलिव्ह ऑईल लावा. यामुळे आपली नखे चमकदार राहतील. यासह नखांना आवश्यक पोषण देखील पुरवले जाईल.

असू शकते बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण!

जर, तुमच्या पायांची नखे पिवळी होत असतील, तर ते बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते. काही लोकांमध्ये, हे अधिक नेलपेंट लावण्यामुळे देखील होऊ शकते, परंतु गडद पिवळा रंग फंगल इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. या अवस्थेत, नखे तुटू लागतात, त्यांचा आकार बदलू लागतो आणि त्यात खूप वेदना होते. गंभीर स्थितीत, या नखांच्या संसर्गामुळे त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. म्हणून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Best home remedies to get rid of yellow nails)

हेही वाचा :

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.