
Daytime Sleepiness: रात्री चांगली झोप झाली असली तरी अनेकदा काहींचा दिवसभरातही थकवा जात नाही. झोप झाल्यासारखं त्यांना वाटत नाही. त्यांचे सकाळी डोळे उघडत नाही. त्यांना पुन्हा झोपावं वाटतं. त्यांना आळस चढतो. त्यांना शारिरीक थकवाही जाणवतो. दिवसाही त्यांना अचानक डुलका लागतो. तर या लक्षणांना गांभीर्यानं घ्या. याकडे दुर्लक्ष करू नका. ही आरोग्याचे काही गंभीर कारणं दर्शवतात.
यामुळे येते दिवसा झोप
रात्री झोपल्यावरही काही जणांना दिवसा आळस झटकता येत नाही. त्यासाठी ते उत्तेजक पेय कॉपी चहा घेतात. अथवा एखाद्या कामात मन रमवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा काही उपयोग होत नाही. हे हायपरसोमनियाचे लक्षण मानल्या जाते. यामुळे व्यक्तीचा डोळाही कधी उघडत नाही. त्याच्या पापण्या जड पडतात. त्याची सुस्ती वाढते. त्याला दिवसभर जड झाल्यासारखं वाटतं.
काय आहेत यामागील कारणं?
जर रात्री झोप मोड होत असेल, लघवीसाठी वारंवार उठावं लागत असेल
नियमित वेळेत झोप घेत नसाल. झोपेची वेळ पाळल्या जात नसेल
झोपण्यापूर्वी पोटभर जेवण आणि मद्यपानाची सवय असेल
झोपण्यापूर्वी मोबाईल पाहण्याचे वेड असेल
कामाचा ताण-तणाव असेल, औषधांचा दुषपरिणाम
अथवा अधिक विचार, कुठल्यातरी गोष्टीचे दडपण
चिंता सतावणे, हुरहुर वाटणे, अनामिक भीती
यावर काय आहे उपाय?
१. सर्वात अगोदर झोपेची एक निश्चित वेळ ठरवा. त्याचवेळेत झोपा
२. पुरेशी झोप झाली की उठा, व्यायाम करा. ध्यानधारणा करा
३. सकाळी अथवा संध्याकाळी फिरायला जा. चालणे हा चांगला व्यायाम मानल्या जातो
४. रात्रीचे जेवण लवकर करा. पण प्रमाणाबाहेर जेवण टाळाच
५. रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना, नामस्मरण करा
६. रात्री मद्यपान, धुम्रपान करत असाल तर ते टाळा
७. झोपण्यापूर्वी टीव्ही अथवा मोबाईल पाहू नका.
८. तरीही सुधारणा होत नसेल तर मग वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या
९. त्यांच्या सल्ल्याने योग्य औषधी घ्या
१०.पुस्तक वाचण्याचा छंद जोपासा