AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: सुपर 8 फेरीत पाकिस्तानची एन्ट्री, उपांत्य फेरीत भारताविरुद्ध होणार लढत? असं असेल गणित

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 चं चित्र स्पष्ट झालं आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहे. पण उपांत्य फेरीत हे संघ भिडू शकतात. कसं काय ते समजून घ्या

T20 WC 2026: सुपर 8 फेरीत पाकिस्तानची एन्ट्री, उपांत्य फेरीत भारताविरुद्ध होणार लढत? असं असेल गणित
सुपर 8 फेरीत पाकिस्तानची एन्ट्री, उपांत्य फेरीत भारताविरुद्ध होणार लढत? असं असेल गणितImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 18, 2026 | 8:00 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला आहे. कारण आता फक्त औपचारिक सामने शिल्लक राहिले आहे. सुपर 8 फेरीचे सर्व संघ ठरल्याने त्या सामन्यांच्या निकालाचा तसा काही फरक पडणार नाही. पाकिस्तानने नामिबियाला पराभूत केलं आणि सुपर 8 फेरीचं चित्र स्पष्ट झालं. पाकिस्तानने सुपर 8 फेरीत जागा मिळवताच त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. आता सुपर 8 फेरीत कशी कामगिरी राहते? यावर पुढचं गणित ठरणार आहे. गट 1 आणि गट 2 असे दोन भाग पडले असून प्रत्येक गटात चार संघ आहे. गट 1 मधील संघ त्याच गटातील संघांशी लढत देणार आहे. प्रत्येक संघाच्या वाटेला तीन सामने येणार आहेत. गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. गट 1 मध्ये भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका आहेत. भारताचे सामने वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेशी होईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत लढत झाली होती. तेव्हा दोन्ही संघ एकाच गटात होते. हा सामना भारताने 61 धावांनी जिंकला होता. आता सुपर 8 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीत आमनासामना होण्याचा प्रश्न येत नाही. पण गणित उपांत्य फेरीत जुळून येऊ शकते. जर भारतीय संघ गट 1 मध्ये पहिल्या स्थानावर आणि पाकिस्तानचा संघ गट 2 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला, तर उपांत्य फेरीत सामना होऊ शकतो. पण तसं झालं नाही तर मग अंतिम फेरीत गणित जुळू शकतं. पण भारत पाकिस्तान या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.

पाकिस्तानचा नामिबियावर 102 धावांनी विजय

पाकिस्तानने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात 199 धावांची खेळी केली आणि 200 धावांचं लक्ष्य दिलं. नामिबियाचा डाव अवघ्या 97 धावांवर आटोपला. पाकिस्तानने या सामन्यात 102 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात साहिबजादा यांनी 58 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. तर नामिबियाला 100 पेक्षा कमी धावांवर रोखण्यात पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिकने महत्त्वाची भूमिका बजावली. तारिकने 3.3 षटकांत 16 धावा देत 4 बळी घेतले. तर शादाब खानने 4 षटकांत 3 बळी घेतले.

Follow Us
जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?
Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात
भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी!
Asaduddin Owaisi | भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी! असदुद्दीन ओवैसींचा थेट हल्लाबोल
मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची...
Bandra Accident | मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची चिमुरड्याला धडक; अंशचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यामध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ
Pune | पुण्याच्या वाकडमध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी
ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?
Mumbai Bank | ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?
नादी लागू नका, सगळी यादी बाहेर काढू!; राजू पाटलांचा नेमका कोणाला इशारा
Raju Patil | नादी लागू नका, सगळी यादी बाहेर काढू!; राजू पाटलांचा नेमका कोणाला इशारा? VIDEO होतोय व्हायरल
पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत
Pune | पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरणार?
मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा...
tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर!
Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी
मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाला..
Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू