AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंना रिटायर करायचं, 2029 साली… शिंदेंच्या बड्या नेत्याचा प्लॅन ठरला; आगामी निवडणुकीत गेम होणार?

मिलिंद देवरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी सचिन अहिर यांचे कौतुक करताना वरळी विधानसभा मतदारसंघावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. 2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार आहे. या भागातल्या आमदारांना आपण रिटायर करायचं आहे, असं मिलिंद देवरा उपस्थितांना उद्देशून बोलले आहेत.

आदित्य ठाकरेंना रिटायर करायचं, 2029 साली... शिंदेंच्या बड्या नेत्याचा प्लॅन ठरला; आगामी निवडणुकीत गेम होणार?
aditya thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2026 | 9:34 PM
Share

Milind Deora : सहा खासदार आणि विश्वासी मानला जाणारा एक आमदार थेट शिंदे गटात गेल्याने माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अस्तित्त्वाची लढाई लढावी लागणार आहे. आमदार सचिन अहिर हे शिंदे गटात जाताच त्यांना विधानपरिषदेचं उपसभापतीपद दिलं गेल्यानं एका प्रकारे ठाकरे यांच्यापुढे मुंबईतही नवं आव्हान उभं केलं जात आहे. अहिर यांचं वरळी मतदारसंघात मोठं प्रस्थ आहे. याच मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. दरम्यान, आता याच आदित्य ठाकरे यांच्याबाबत शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानानंतर भविष्यातील विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात चुरशीची आणि अस्तित्त्वाची लढाई लढली जाण्याची शक्यता आहे.

2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार

मिलिंद देवरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी सचिन अहिर यांचे कौतुक करताना वरळी विधानसभा मतदारसंघावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. 2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार आहे. या भागातल्या आमदारांना आपण रिटायर करायचं आहे, असं मिलिंद देवरा उपस्थितांना उद्देशून बोलले आहेत. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. देवरा यांनी आदित्य ठाकरेंचे प्रत्यक्ष नाव घेतले नाही. परंतु त्यांचा रोख हा आदित्य ठाकरेंकडेच होता, असे बोलले जात आहे.

आमचा बाँड खूपच स्ट्राँग

आज इथे लोकांची एवढी गर्दी पाहून मला वाटतंय की 2029 लाी नक्कीच बद्दल होणार आहे. बदल होणार म्हणजे वरळीचा आमदार बदलणार आहे. शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो कारण सर्वसामान्य वरळीकरांचा तर खूप फायदा होणार आहे. सचिन अहिर यांनी माझे वडील मुरली देवरा यांच्यासोबतही काम केलेले आहे. आमचा बाँड खूपच स्ट्राँग आहे. आज आपण एका टीममध्ये आहोत याचा मला आनंद आहे, असे मतही मिलींद देवरा यांनी व्यक्त केले. सचिन भाऊ यांच्या नेतृत्वात वरळीकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. उपसभापती हे खूप महत्त्वाचे पद आहे, असेही देवरा म्हणाले. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ