AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CHILD CARE | तुमचं मूल वारंवार लघवी करतंय?, दुर्लक्ष करू नका, या आजाराची असू शकतात लक्षणे

लहान मुलांमध्ये वारंवार लघवीची समस्या येणे खूप सामान्य आहे. परंतु जर ते रात्रीपेक्षा दिवसा जास्तवेळा लघवी करत असतील तर ही पोलॅकिरियाची चिन्हे आहेत. त्यामुळे काळजी घ्या आणि पोलकिरीयाचा धोका टाळा. (Does your child urinate frequently, Don't ignore it, there may be symptoms of this disease)

CHILD CARE | तुमचं मूल वारंवार लघवी करतंय?, दुर्लक्ष करू नका, या आजाराची असू शकतात लक्षणे
तुमचं मूल वारंवार लघवी करतंय?, दुर्लक्ष करू नका
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 25, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : मुले लहानपणी अंथरूणात लघवी करतात. ही खरंतरं सर्वसामान्य गोष्ट. पण जर तुमचे मूल वारंवार लघवी करीत असेल मग ते अंथरुणात असो वा बाथरुममध्ये. याकडे दुर्लक्ष करू नका. यात टेन्शन करण्यासारखे काही नाही, असे समजू नका. कारण ही गोष्ट तुमची चिंता वाढवणारी ठरू शकते. जी मुले दिवसा वारंवार लघवी करतात, त्यांना काही आजाराचे लक्षण असते. ही समस्या 3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सामान्य आहे. परंतु कधीकधी हे यापेक्षा मोठ्या मुलांमध्ये देखील पाहिले जाते. मुलांमध्ये वारंवार लघवी होणे पोलाकिरीया नावाच्या आजारामुळे असू शकते. यामध्ये मुलास नेहमीपेक्षा जास्त लघवी होते. बहुतांश वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की मुलांना लघवी कंट्रोल होत नाही. बाथरूममध्ये पोहचण्याआधीच लघवी बाहेर येते. (Does your child urinate frequently, Don’t ignore it, there may be symptoms of this disease)

पोलाकिरीयाची लक्षणे

1. मूल दर अर्ध्या तासाने लघवी करण्यासाठी जाते. 2. कधीकधी एखाद्याला दिवसातून 40 वेळा जावे लागते. 3. प्रत्येक वेळी लघवी करण्यासाठी जाताना थोडी थोडी लघवी होणे

तज्ज्ञांच्या मतानुसार पोलाकिरियाची काही संभाव्य कारणे

1. मुलाला प्रथमच शाळेत जाण्याची भीती 2. मुलाची छेडछाड 3. नवीन ठिकाणी स्थलांतरीत होणे 4. घरात नवीन बाळाचे आगमन 5. पालकांमधील मतभेदांमुळे मुलाच्या मनात भीती 6. शरीरात रासायनिक बदल 7. मुलांनी जास्त मीठ खाणे 8. एंग्जाइटी डिसऑर्डर 9. लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढणे 10. वारंवार लघवी करण्याविषयी विचार करणे 11. जास्त प्रमाणात दूध किंवा कॅफिन घेतल्यानेही समस्या उद्भवते. 12. मूत्राशय अधिक सक्रिय झाल्यामुळे पोलकिरीया होतो.

या गोष्टींकडे कानाडोळा करू नका

1. लघवी करताना आपल्या मुलास कोणतीही वेदना जाणवते. 2. तुमच्या मुलाच्या लघवीचा रंग जाड आणि गंधरस आहे. 3. मुलाला कपड्यांमध्ये लघवी होते. 4. आपल्या मुलाचे वजन खूपच कमी झाले असेल. 5. मूल पूवीर्पेक्षा अधिक द्रवपदार्थ पित असेल तर लक्ष द्या. म्हणजेच मुलाला जास्त तहान लागते.

पालकांनी ही काळजी घ्यावी

– वारंवार बाथरूममध्ये जाणे चांगले नसल्याचे मुलांना पटवून द्या – मुलाला आवडत्या व्यंगचित्रांमध्ये व्यस्त ठेवा. – मुलासाठी समुपदेशन किंवा थेरपी करा. – पालकांनी मुलाला सांगितले पाहिजे की त्याला कोणताही मोठा आजार झालेला नाही. (Does your child urinate frequently, Don’t ignore it, there may be symptoms of this disease)

इतर बातम्या

पुरुषांमध्ये सर्वात आधी ‘ही’ गोष्ट पाहतात महिला, नंतरच घेतात निर्णय

चांगले आरोग्य पाहिजे आहे तर दिवसातून एक केळी खा!

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?