अंगदुखीपासून ते सर्दी तापावर रामबाण उपाय म्हणजे ‘गवती चहा’

| Updated on: Apr 08, 2021 | 7:40 AM

सकाळी झोपेतून उठलं की सर्वात आधी कुठल्या गोष्टीची गरज वाटत असेल तर तो म्हणजे चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते.

अंगदुखीपासून ते सर्दी तापावर रामबाण उपाय म्हणजे गवती चहा
दररोज सकाळी प्या ही देशी पेये, खोकला आणि सर्दी होईल दूर
Follow us on

मुंबई : सकाळी झोपेतून उठलं की सर्वात आधी कुठल्या गोष्टीची गरज वाटत असेल तर तो म्हणजे चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते. बरेच लोक दिवसभरात 8 ते 10 कप चहा पितात. चहा पाणी, दूध, चहापत्ती आणि साखर पासून तयार केला जातो. मात्र, सर्वसामान्य चहा पेक्षा आयुर्वेदिक चहा पिण्यावर लोकांचा भर वाढला आहे. यामध्ये गवती चहा ग्रीन टी, ब्लॅक टी, हर्बल टी, कॅमोमाईल टी, दालचिनीचा चहा असे वेगवेगळे प्रकार चहामध्ये आले आहेत. (Drinking herbal tea is beneficial for health)

-यामध्येही गवती चहा पिण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण गवती चहामुळे पोषक तत्व, विटॅमिन, अँटीऑक्सिडेंट मिळतात. हा चहा पुर्णपणे आयुर्वेदिक चहा आहे. गवती चहाच्या सेवनामुळे पोटदुखी सारखे विकार देखील दूर होतात. जर तुमचे खूप डोके दुखत असेल तर गवती चहा घ्यावा यामुळे तुमची डोकेदुखी दूर होईल.

-गवती चहाच नाहीतर त्याचा काढा देखील खूप प्रभावी आहे. ताप सर्दी आणि खोकला येत असेल तर दिवसातून साधारण तीन ते चार वेळा गवती चहा पिलातर तुम्हाला बरे वाढेल. अंग दुखी असेल तर गवती चहाच्या तेलाने मलिश करा तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.

-रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे मळमळ आणि चिंताग्रस्तपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त बर्‍याच आरोग्य तज्ञांचे मत आहे की दररोज रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

-लोकांचा असा विश्वास आहे की, सकाळी चहा पिण्यामुळे शरीरात चपळता येते, परंतु हे चुकीचे आहे. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि चिडचिड होते.
-तुम्ही सकाळी उठून उपाशी पोटी चहा पित असाल तर, प्रोस्टेट कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Drinking herbal tea is beneficial for health)