AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे की नाही? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

जेव्हा जेव्हा उष्णतेचे तापमान वाढते तेव्हा आपल्याला फक्त थंड पाणी प्यावेसे वाटते. पण प्रश्न असा पडतो की उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे की नाही? तसेच, त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? अशा आरोग्याशी संबंधीत अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. अशावेळेस या प्रश्नाचे उत्तर आजच्या या लेखातून जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे की नाही? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Water Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 2:05 PM
Share

वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येकजण थंड पाणी पित असतो. तसेच थंड फळांचे ज्यूस प्यायल्याने तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम मिळू शकतो, परंतु जास्त थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नसते. यावर अनेक रिसर्च झाले आहेत, ज्यात असे दिसून आले आहे की कोमट पाणी पिणे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारण्यासोबतच ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास देखील मदत करते. पण उन्हाळ्यात आपण कोमट पाणी पिऊ शकतो का?

असा प्रश्न अनेकांना पडतो. अशातच तुम्ही जेव्हा कडक उन्हातून घरी येता, तेव्हा तुम्ही लगेच थंड पाणी पिऊ नये, त्याऐवजी तुम्ही फक्त सामान्य पाणी प्यावे, त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही.

शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते

गरम पाणी तुमच्या शरीरातील घाण नैसर्गिक पद्धतीने काढून टाकण्यास मदत करते. तर थंड पाणी पिण्यामुळे शिरा आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्ताभिसरण मंदावते. जर तुम्ही गरम पाण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या आकुंचन झालेल्या शिरा मोकळे होतात. तसेच मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य सुधारते.

आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते

पोट फुगणे किंवा पेटके येणे आणि पचनाच्या समस्या असल्यासही गरम पाणी खूप फायदेशीर आहे. थंड पाणी प्यायल्याने पोटाला किंवा शरीराला आणखीण त्रास होऊ शकतो. गरम पाणी तुमच्या पोटाचे तापमान कमी करते आणि एन्झाईम्सची क्रिया देखील मंदावते.

कोमट पाणी पिताना वेळेची काळजी घ्या

जर तुम्हाला कोमट पाणी पिण्याची सवय असेल तर वेळेची विशेष काळजी घ्या. सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर अर्धा तासाने ते प्या. याचे तुम्हाला तात्काळ फायदे दिसतील. एनसीबीआयच्या एका संशोधनानुसार, कोमट पाणी पिणे आतडे सुधारण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

चांगले चयापचय

काही संशोधनातून असे दिसून आले आहे की गरम पाणी पिल्याने चयापचय वाढू शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

ताणतणाव कमी करणे

तुम्ही जर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायले तर तुमचा ताण आणि चिंता काही प्रमाणात कमी होते. कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी होण्यास, स्नायूंना आराम मिळण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच कोमट पाणी प्यायल्याने ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारे पेटक्यांचा त्रास कमी करण्यास आणि डोकेदुखी आणि मायग्रेन कमी करण्यास देखील मदत करू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.