कोरड्या केसांच्या समस्येवर अशी करा मात, ‘या’ पद्धतींचा करा वापर!

पावसाळ्यात कोरड्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी खोबरेल तेल आणि अंडी एकत्र करून लावावे. त्यासाठी तुम्ही दोन्ही गोष्टी मिक्स करा. मग अर्धा तास असेच ठेवावे. त्यानंतर डोकं झाकून घ्या. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून घ्या. आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे लावू शकता.

कोरड्या केसांच्या समस्येवर अशी करा मात, या पद्धतींचा करा वापर!
hair care
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 25, 2023 | 8:39 PM

मुंबई: केसांच्या समस्येने लोक खूप अस्वस्थ असतात. अनेकांचे केस कोरडे आणि निर्जीव होतात. बऱ्याच लोकांचे केस पातळ आणि खराब असतात. तथापि, या सर्व केसांच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी, लोक विविध उपाय करून बघतात. पण तरीही फारसा फरक दिसून येत नाही किंवा कुठेतरी असे होऊ शकते की आपण त्या हेअर प्रॉडक्ट्सचा योग्य वापर करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला कोरडे केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी नारळ तेलाचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत. कदाचित केसांना तेल लावण्याची पद्धत काहीतरी वेगळी असेल. म्हणून इथे नमूद केलेल्या काही पद्धतींचा वापर करा.

खोबरेल तेल

केस कोरडे झाले असतील तर नारळाच्या तेलाने डोक्याला चांगली मसाज करा. यासाठी आधी खोबरेल तेल गरम करा आणि नंतर टाळूवर 10 मिनिटे मसाज करा. सुमारे अर्धा तास हे तेल लावल्यानंतर सौम्य शॅम्पूने डोके धुवावे. अशा प्रकारे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खोबरेल तेलाचा वापर करा.

खोबरेल तेल आणि अंडी

कोरड्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी खोबरेल तेल आणि अंडी एकत्र करून लावावे. त्यासाठी तुम्ही दोन्ही गोष्टी मिक्स करा. मग अर्धा तास असेच ठेवावे. त्यानंतर डोकं झाकून घ्या. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून घ्या. आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे लावू शकता.

खोबरेल तेल आणि दही

कोरड्या केसांसाठी अर्धा कप दही आणि 2 ते 3 चमचे खोबरेल तेल घालावे. यानंतर ते टाळूवर चांगले लावा. दही आणि खोबरेल तेलाचा हा हेअर पॅक अर्धा तास ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्यावेत. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसू लागेल.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)