
बदलत्या वातावरणात प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत असतो. अशातच लहान मुलांना सर्वात जास्त पोषणाची गरज असते कारण वाढत्या वयानुसार आणि विकासाच्या प्रक्रियेत ते महत्वाचे असते. अशातच मुलांना शाळेच्या डब्यात प्रत्येक आई भाजी, चपाती आणि पराठे देत असते, परंतु हळूहळू हे देखील कमी झाले आणि बहुतेक माता हे मुलांच्या आवडीचे मॅकरोनी, पास्ता, इन्स्टंट नूडल्स असे जंक फूड त्यांच्या डब्यात देत आहेत, जेणेकरून मुलं डब्यातील पदार्थ पुर्ण खाऊन येतील. परंतु या सर्व गोष्टी काळांतराने मुलांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतील.
अशातच मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे टिफिनमध्ये पौष्टिकतेने भरलेले तसेच चविष्ट पदार्थ सहज बनवून देऊ शकता. कारण मुलांना निरोगी पोषणयुक्त असे दुपारचे जेवण देणे खूप महत्वाचे आहे कारण ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त आहे आणि शाळेत संपूर्ण दिवस सक्रिय राहण्यास देखील मदत करते. यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी देखील विकसित होतात. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे 5 पदार्थ नक्की समावेश करा. चला तर मग आजच्या लेखात आपण झटपट तयार होणाऱ्या पदार्थांची रेसिपी जाणून घेऊयात.
दक्षिण भारतीय पदार्थांबद्दल बोलायचे झाले तर, इडली सांबार हा खूप आरोग्यदायी पदार्थ आहे. इडलीच्या पीठामध्ये भाज्या मिक्स करून तुम्ही इडली आणखी आरोग्यदायी बनवू शकता. यासाठी तुम्ही इडलीच्या पीठात गाजर, बीन्स, वाटाणे, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या विविध भाज्या बारीक चिरून त्यात मिक्स करा आणि नंतर साच्यात ठेवा आणि वाफवून इडली तयार करा. तुम्ही ते मुलांच्या टिफिनमध्ये फक्त नारळाच्या चटणीसह त्यांना देऊ शकता.
तुम्हाला जर प्रथिनयुक्त असा मुलांना टिफिन द्याचा असेल तर मूग डाळीचा चिल्ला हा एक उत्तम पदार्थ आहे. तसेच हा पदार्थ बनवायला जास्त वेळ लागणार नाही. मुगाची डाळ रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून त्यांची बारीक पेस्ट बनवून चिल्ला बनवा. तुम्ही त्यात पनीर आणि तुमच्या आवडीच्या भाज्यांचा देखील समावेश करू शकता. जर तुम्हाला मुग डाळीचा त्रास होत असेल, तर मल्टीग्रेन पीठ दळून घ्या आणि त्याचा चिल्ला बनवून मुलांना दुपाऱ्याच्या जेवणाच्या डब्यात द्या.
तुम्ही मुलांसाठी त्यांच्या टिफिनमध्ये मिक्स व्हेजिटेबल पराठे बनवू शकता. यासाठी वेगवेगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या आणि त्या वाफवून घ्या आणि त्यात बेसिक मसाले मिक्स करा. फक्त लक्षात ठेवा की भाज्यांमध्ये ओलावा नसावा, म्हणून त्यातील पाणी पुर्णपणे काढून घ्या. वाफवलेल्या भाज्यामधील पाणी घेऊन पीठ मळून घ्यावे जेणेकरून पोषणाची कमतरता भासणार नाही. मुलांना टिफिनमध्ये दिलेले हे स्वादिष्ट पराठे खूप आवडतील.
तुम्हाला तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी निरोगी आणि चविष्ट पदार्थ द्यायचे असतील तर तुम्ही त्यांना चपातीचे व्हेजिटेबल रोल देऊ शकता. यासाठी चपाती तयार करा आणि नंतर भाजून घ्या. एका पॅनमध्ये भिजवलेले सोयाबीनचे तुकडे, काही भाज्या, सॉसेज, बेसिक मसाल्यांमध्ये मिक्स करून थोड्याशा तेलावर शिजवून घ्या. आता तयार केलेले सोयाबिनचे फिलिंग चपातीमध्ये टाका आणि रोल करून टिफिनमध्ये पॅक करा.
मुलांना सँडविच खायला खूप आवडते. तर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये ब्रेडशिवाय सँडविच बनवू शकता, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अनेक व्हिडिओ सहज मिळतील. याशिवाय तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड घेऊ शकता. तर मुलांच्या आवडीचा पनीर सँडविच बनवून देऊ शकता. यासाठी तुम्ही पनीर चे बारीक किसून घ्या यात उकडलेले कॉर्न टाकून त्यात मीठ मसाले मिक्स करून सँडविच तयार करा व ते टिफिनमध्ये पॅक करा. त्यात वेगवेगळ्या भाज्या देखील मिक्स करून सँडविच बनवता येते, ज्यामुळे अधिक पोषक घटक वाढतील.
तुमच्याकडे वेळ नसेल तर इन्स्टंट नूडल्सऐवजी रवा उपमा बनवून मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. यासाठी प्रथम रवा थोडा भाजून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये थोडे तेल किंवा देशी तूप टाका आणि मोहरी, कढीपत्ता टाका आणि बेसिक मसाले, कांदा, टोमॅटो आणि काही भाज्या परतून घ्या. त्यानंतर, भाजलेला रवा त्यात टाकून मिक्स करा आणि उकळलेले गरम पाणी टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. आता त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. एकदा ढवळून आणखी 2 मिनिटे ठेवा. हिरव्या कोथिंबीरीने रवा उपमा सजवा आणि टिफिनमध्ये पॅक करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)