
आता अनेकांनी विमानप्रवास केला असेल. तसेच त्यासाठी ऑनलाईन बुकींगही केलं असेल. प्रत्येक सीट आणि विमानाची रचना ही प्रवाशांच्या सोयीनुसारच केलेली असते. मात्र तुम्ही विमानाने प्रवास करताना काही विमानांमध्ये तुम्ही लक्षात घेतले आहे का की सीट 12 क्रमांकानंतर थेट 14 क्रमांकाची सीट्सची रांग येते. म्हणजे काही विमानांमध्ये 13 क्रमांकाची रांगच नसते. होय, आणि ही चूक नाही, तर जगभरात 13 नंबरबाबत असलेल्या अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धेमुळे असे केले जाते, ज्यावर अनेक विमान कंपन्या विश्वासही ठेवतात. घरे बांधताना किंवा हॉटेलच्या खोल्यांमध्ये, जिथे 13 क्रमांकाच्या खोल्या किंवा फ्लॅट नसतो, अशीच परिस्थिती आता काही फ्लाइटमध्येही पाहायला मिळते. पण फ्लाईटमध्ये 13 नंबरची सीट्सची रांग नसणे याबाबात नक्की काय कारण आहे हे जाणून घेऊयात.
काही एयरलाइन्स 13 नंबरचा रो का वगळतात?
13 या संख्येच्या भीतीला “ट्रायस्काइडेकाफोबिया” (Triskaidekaphobia)असं म्हणतात. या संख्येची भीती खूप जुनी आहे आणि 1911 च्या अमेरिकन सायकॉलॉजी जर्नलमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला होता. बरेच लोक असे मानतात की 13 ही एक अशुभ संख्या आहे. तिचा धर्म, कथा आणि परंपरांशी संबंध आहे. उदाहरणार्थ, काही लोकांचा असा विश्वास आहे की “शेवटच्या जेवणात” येशूचा विश्वासघात करणारा यहूदा हा 13 वा पाहुणा होता.
म्हणूनच अनेक विमान कंपन्या 13 क्रमांकाची रो वगळतात
काही लोक याला नॉर्स पौराणिक कथांशी जोडतात. दुसरे कारण म्हणजे 12 हा आकडा हा पूर्णत्वाचे प्रतीक मानला जातो. उदा. 12 महिने, 12 राशी, म्हणून 13 हा “वाईट” किंवा “अशुभ” क्रमांक मानला जातो. म्हणूनच अनेक विमान कंपन्या 13 क्रमांकाची रो वगळतात, जेणेकरून ज्या प्रवाशांना 13 नंबरची भीती असेल तर त्यांना मानसिक ताण सहन करावा लागू नये.
रो 17 आणि इतर देशांच्या अंधश्रद्धा
फक्त १३च नाही, तर इटली आणि ब्राझीलसारखे काही देशही 17 अंकाला देखील अशुभ मानले जाते. कारण तिथे असे मानले जाते की रोमन अंक 17 हा -XVII असा लिहिला जातो, जर तो उलट केला तर तो VIXI होतो, ज्याचा लॅटिनमध्ये अर्थ “मी जगलो आहे”, म्हणजेच “आता माझे आयुष्य संपले आहे” असं होतं. लुफ्थांसा (जर्मन एअरलाइन) च्या मते, ‘आम्ही जगभरातील प्रवाशांच्या श्रद्धांचा आदर करतो, म्हणून त्यांच्या फ्लाईटमध्ये 13 आणि 17 या दोन्ही सीट्सच्यारो वगळलेल्या असू शकतात.
कोणत्या एअरलाीन्स हे नियम फॉलो करतात
यूरोप च्या एयरलाइंस: लुफ्थांसा, रायनएअर, आयबेरिया, आयटीए, केएलएम, एअर फ्रान्स
मिडिल ईस्ट: एमिरेट्स, कतार एअरवेज
एशियाई एयरलाइंस : सिंगापूर एअरलाइन्स, कॅथे पॅसिफिक, थाई एअरवेज, हाँगकाँग
काही कंपन्या असं करत नाही
अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा, साउथवेस्ट एअरलाइन्समध्ये 13 नंबरची रो आहे. युनायटेड एअरलाइन्समध्ये बऱ्याचदा 13 आणि 14 वी दोन्ही रो वगळलेले जातात. कारण चीनी संस्कृतीत 14 चा अर्थ “मरणे” असा होतो. यूकेमध्ये: व्हर्जिन अटलांटिक – 13 वी रो नाही, ब्रिटिश एअरवेज, इझीजेट, Jet2.com मध्ये 13 वी रो आहे.
13 तारखेला तिकिटे 39% पर्यंत स्वस्त असू शकतात कारण…
विमान प्रवासातील अंधश्रद्धा केवळ सीट्सच्या संख्येपुरती मर्यादित नाहीत, तर अनेक प्रवाशांचे स्वतःचे काही नियम आहेत:
> असं म्हटलं जातं की 13 तारीख आणि त्यादिवशी जर शुक्रवार असेल तर फार कोणी विमान प्रवास करणार नाही.
> काही लोक विमानात चढण्यापूर्वी विमानाला स्पर्श करून पाया पडतात, त्यामुळे त्यांना शांती मिळते.
> आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे 13 तारखेला तिकिटे 39% पर्यंत स्वस्त असू शकतात, कारण बरेच लोक या दिवशी विमान प्रवास करणे टाळतात.