पार्लरसारखी हेअरस्टाईल मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ घरगुती टिप्स!

हा मास्क केसांमध्ये 2 तास लावून ठेवा. आता डोके पाण्याने पूर्ण धुवून घ्या. या तीन गोष्टींचा वास बाहेर येणार नाही अशा पद्धतीने केस धुवावेत. आठवड्यातून दोनदा केसांसाठी हा घरगुती उपाय करा. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसू लागेल.

पार्लरसारखी हेअरस्टाईल मिळवण्यासाठी फॉलो करा या घरगुती टिप्स!
grow hair faster
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 12, 2023 | 4:01 PM

मुंबई: केसांची काळजी घेण्यासाठी मुली महागड्या पार्लरमध्ये हेअर ट्रीटमेंट घेतात. ज्यामुळे केस स्टायलिश आणि सुंदर दिसतात. पण त्यांच्या केसांचा पोत काय आहे याची त्यांना कल्पना नसते. केसांची स्टाईल प्रत्येक गोष्टीवर अवलंबून असते. त्यामुळे केसांचा पोत समजून घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी महागडे पार्लर सोडून इथे सांगितलेल्या काही खास घरगुती टिप्स ट्राय करा. घरात असलेल्या या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचे केस लांब आणि दाट बनवू शकता. यामुळे तुमच्या केसांचे अनेक प्रकारच्या रसायनांपासून संरक्षण होईल. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी…

पार्लरसारखी हेअरस्टाईल मिळवण्यासाठी…

2 केळी, 2 अंडी, 1 लिंबू

केसांना घरी पार्लरसारखा ट्रीटमेंट देण्यासाठी दोन केळी मॅश करा. त्यानंतर त्यात 2 अंडी आणि 1 लिंबाचा रस घाला. या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करा. यानंतर हा हेअर मास्क हळूहळू केसांच्या टाळूवर लावा. केसांच्या लांबीवरही तुम्ही हे लावू शकता. हा मास्क केसांमध्ये 2 तास लावून ठेवा. आता डोके पाण्याने पूर्ण धुवून घ्या. या तीन गोष्टींचा वास बाहेर येणार नाही अशा पद्धतीने केस धुवावेत. आठवड्यातून दोनदा केसांसाठी हा घरगुती उपाय करा. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसू लागेल.

केळी, अंडी आणि लिंबापासून बनवलेला मास्क केसांना लावल्यास केस गुळगुळीत आणि चमकदार होतील. केस चमकू लागतील. यामुळे तुमचे स्प्लिट एंड्स कमी होतील. आठवड्यातून 2 वेळा हा मास्क लावल्याने लिंबामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स केसांचे संरक्षण करतात, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही. तसेच अंड्यामुळे केसांना भरपूर प्रथिने मिळतात, ज्यामुळे केस मुळांपेक्षा मजबूत होतात.