Travel | दोन-तीन हजार नाही, तर दोन-तीन लाखांच्या घरात तिकिटांच्या किंमती, वाचा ‘या’ खास ट्रेनबद्दल…

| Updated on: Mar 16, 2021 | 8:55 AM

अशा बर्‍याच गाड्या भारतातल्या रेल्वे रुळांवरही धावतात, ज्यांना ‘पंचतारांकित हॉटेल’ म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या गाड्या केवळ फाईल स्टार हॉटेलसारख्या सुविधा देत नाहीत, तर तुम्हाला रॉयल प्रवासाचा अनुभवही देतात.

Travel | दोन-तीन हजार नाही, तर दोन-तीन लाखांच्या घरात तिकिटांच्या किंमती, वाचा ‘या’ खास ट्रेनबद्दल...
गोल्डन चॅरियट
Follow us on

मुंबई : अशा बर्‍याच गाड्या भारतातल्या रेल्वे रुळांवरही धावतात, ज्यांना ‘पंचतारांकित हॉटेल’ म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या गाड्या केवळ फाईल स्टार हॉटेलसारख्या सुविधा देत नाहीत, तर तुम्हाला रॉयल प्रवासाचा अनुभवही देतात. या गाड्यांमध्ये समाविष्ट असलेले एक नाव आहे ‘गोल्डन चॅरियट’. ही अशी ट्रेन आहे जी आयआरसीटीसीच्या इतर लक्झरी गाड्यांशीही स्पर्धा करते. कोव्हिडमुळे बराच काळ बंद असणारी ही ट्रेन आता पर्यटकांसाठी पुन्हा एकदा सुरू झाली आहे (Golden Chariot Know the details about this luxurious train, fare and travel).

दक्षिण भारत राजेशाही सफर घडवण्यासाठी प्रसिध्द असलेली ‘गोल्डन चॅरियट’ रविवारीपासून सुरू झाली आहे आणि पुन्हा एकदा प्रवाशांना ट्रेनमध्ये राजवाडा अनुभवायला मिळणार आहे. 2008मध्ये सुरू झालेली ही ट्रेन कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत चालवली जात होती. परंतु, आता आयआरसीटी हिच्या बर्‍याचशा सेवा देत आहे. ट्रेन पुन्हा सुरू झाली आहे, त्यामध्ये लक्झरी रूम असणारे डबे आहेत आणि यातून आपण दक्षिण भारतातील बर्‍याच शहरांची सफर करू शकाल. चला तर, जाणून घेऊया या ट्रेनमध्ये काय खास आहे आणि त्यामध्ये प्रवास करण्यासाठी आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील…

कुठून धावते ‘ही’ ट्रेन?

जरी ही रेल्वे कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या मार्गांना जोडते, तरी त्यात वेगळी पॅकेजेस आहेत. या पॅकेजद्वारे प्रवास करताना, या ट्रेनमध्ये राहण्याची आणि खाण्या-पिण्याची पूर्ण व्यवस्था होते. ही ट्रेन आपल्याला सामान्य गाड्यांप्रमाणे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सोडत नाही, त्याऐवजी आपण त्यात बसून एका शहरातून दुसर्‍या शहरात जाऊ शकता आणि तेथे फिरू शकता (Golden Chariot Know the details about this luxurious train, fare and travel).

ही ट्रेन एक प्रकारे केवळ ट्रॅव्हल पॅकेज म्हणून काम करते. यात एकच मार्ग असतो आणि त्याद्वारे लोकांना फिरवले जाते आणि हॉटेल म्हणून त्यांना या ट्रेनमध्येच रहावे लागते. ही ट्रेन तिच्या विशेष लक्झरी सुविधांमुळे ओळखली जाते.

किती दिवसांचा असतो प्रवास?

यात स्वतंत्र पॅकेजेस आहेत आणि त्याद्वारे प्रवास करता येतो. यात आपण 6 रात्री ते 7 दिवसंपासून ते 3 दिवसांपर्यंतच्या योजना देखील बनवू शकता. या ट्रेनचा प्रवास बंगळुरू येथून सुरू होतो आणि ट्रेनने तुम्हाला बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, म्हैसूर, हलेबिडू, चिक्कामंगलुरू आणि गोवा येथे नेले जाते. याशिवाय या सहलीमध्ये बरीच ऐतिहासिक स्थळे देखील फिरवली जातात आणि त्यानंतर पुन्हा बंगळुरुमध्ये येऊन हा प्रवास संपतो. जेव्हा गाड्या शहरात येतात, तेव्हा प्रवाशांना एसी बसमधून साईड सीनसाठी फिरवले जाते.

तिकिटाचे दर काय?

या ट्रेनमध्ये बऱ्याच सुविधा आहेत. परंतु, या प्रवासासाठी तुम्हालाही मोठी किंमत मोजावी लागतील. यामध्ये तुम्ही डिलक्स केबिन पॅकेज घेतल्यास तुम्हाला 3 लाख 20 हजार रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर या पॅकेजमध्ये प्रवाशांच्या संख्येनुसार बदलही केला जातो. या पैशात तुम्हाला विविध देशांचे पदार्थ, वाईन इत्यादी देखील चाखायला मिळतात. यामध्ये तुम्हाला जिम, स्पाची सुविधादेखील मिळते.

(Golden Chariot Know the details about this luxurious train, fare and travel)

हेही वाचा :

Trave | जगप्रसिद्ध चहाचे मळे पाहायला ‘आसाम’ फिरण्याची योजना आखताय? मग, वाचा ‘या’ राज्याविषयी काही खास गोष्टी…

Travel | ‘Gods Own Country’ केरळ, चहा आणि मसाल्यांव्यतिरिक्त ‘या’ ठिकाणांसाठी प्रसिद्ध!