Spotless Skin हवी असेल तर गुलाब पाण्यात मिक्स करून लावा या 2 गोष्टी

| Updated on: May 24, 2023 | 4:24 PM

या फेसपॅकच्या वापराने आपल्या त्वचेवरील मुरुम, गडद डाग किंवा पिग्मेंटेशन सारखे डाग पूर्णपणे गायब होऊ लागतात. इतकंच नाही तर आपल्या त्वचेवरील मृत त्वचा आणि साचलेली घाण काढून टाकण्यास देखील मदत करते, तर चला जाणून घेऊया स्पॉटलेस स्किन फेसपॅक कसा बनवायचा.

Spotless Skin हवी असेल तर गुलाब पाण्यात मिक्स करून लावा या 2 गोष्टी
Spotless skin
Follow us on

मुंबई: गुलाब पाणी हे एक सौंदर्य उत्पादन आहे जे प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी समाविष्ट केले गेले आहे. गुलाबजल हे परवडणारे तसेच त्वचेसाठी उत्तम आहे. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी स्पॉटलेस स्किन फेसपॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. उन्हाळ्यात गुलाबपाणी आपली त्वचा हायड्रेट ठेवते. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहते. या फेसपॅकच्या वापराने आपल्या त्वचेवरील मुरुम, गडद डाग किंवा पिग्मेंटेशन सारखे डाग पूर्णपणे गायब होऊ लागतात. इतकंच नाही तर आपल्या त्वचेवरील मृत त्वचा आणि साचलेली घाण काढून टाकण्यास देखील मदत करते, तर चला जाणून घेऊया स्पॉटलेस स्किन फेसपॅक कसा बनवायचा.

स्पॉटलेस स्किन फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • गुलाबजल १ चमचा
  • संत्र्याची साल पावडर १ चमचा
  • मध १ चमचा

स्पॉटलेस स्किन फेस पॅक कसा बनवावा?

  • स्पॉटलेस स्किन फेसपॅक तयार करण्यासाठी, एक छोटी वाटी घ्या.
  • नंतर त्यात १ चमचा गुलाबजल, संत्र्याची साल पावडर आणि १ चमचा मध घाला.
  • यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा.
  • आता तुमचा स्पॉटलेस स्किन फेसपॅक तयार आहे.

स्पॉटलेस स्किन फेसपॅक कसा लावावा?

  • स्पॉटलेस स्किन फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवा.
  • मग तयार पॅकचा थोडासा भाग बोटावर घेऊन चेहऱ्यावर चांगला लावा.
  • यानंतर आपण पॅक चांगले कोरडे होण्यासाठी सोडा.
  • त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल किंवा मॉइश्चरायझर लावावे.
  • चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून 3 वेळा सकाळी आणि संध्याकाळी हा पॅक लावा.
  • यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग कमी होतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)