हेअर स्ट्रेटनिंग करुन 17 वर्षीय मुलगी घरी आली, काही वेळातच किडणी फेल! नेमकं काय झालं?
हेअर स्ट्रेटनिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे किडनीचे गंभीर नुकसान होऊ शकते. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 17 वर्षांच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं?

आजकाल मुली आणि महिलांना आपले केस सरळ, मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंगसारख्या ट्रीटमेंटचा आधार घेतात. सलूनमध्ये केली जाणारी ही ट्रीटमेंट तात्काळ चांगले परिणाम देतात, पण त्यात वापरले जाणारे रसायने दीर्घकाळात गंभीर आजारांचे कारण बनू शकतात. सुंदर दिसण्याच्या घाईत अनेकदा यांच्या दुष्परिणामांना दुर्लक्षित केले जाते. एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 17 वर्षीय मुलगी स्ट्रेटनिंग करुन घरी आली त्यानंतर जे घडलं अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
धक्कादायक घटना समोर आली
अलीकडेच इस्त्रायलमधून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. 17 वर्षीय मुलीला हेअर स्ट्रेटनिंग करून घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. अहवालानुसार, या ट्रीटमेंटनंतर तिच्या किडनीला गंभीर नुकसान पोहोचले. मुलीला गंभीर किडनी फेल्युअरच्या अवस्थेत शारे झेडेक मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. ही पहिली घटना नाही. याआधी गेल्या महिन्यात २५ वर्षीय एका महिलेलाही हेअर स्ट्रेटनिंगनंतर किडनी डॅमेज झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सतत अशी प्रकरणे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहे की हेअर स्ट्रेटनिंग खरंच सुरक्षित आहे का?
कोणती लक्षणे दिसली
रुग्णालयाच्या अहवालानुसार, हेअर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट केल्यानंतर काही वेळातच मुलीला सतत उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. अवस्था बिघडल्यावर तिला तात्काळ रुग्णालयात नेले असता, तपासणीत समजले की तिची किडनी गंभीरपणे प्रभावित झाली आहे.
हेअर स्ट्रेटनिंग आणि किडणी डॅमेज यांचा संबंध
नेफ्रोलॉजी इन्स्टिट्यूटच्या प्रमुख प्रोफेसर लिंडा शावित आणि डॉ. एलोन बेनाया यांनी 2023 मध्ये केलेल्या एका अभ्यासात या धोक्याची पुष्टी झाली आहे. या संशोधनात 14 ते 58 वर्षे वयोगटातील 26 महिलांच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. ज्यांना याआधी कोणताही गंभीर आजार नव्हता, पण त्या अचानक गंभीर किडणी फेल्युअर घेऊन रुग्णालयात पोहोचल्या. संशोधकांना आढळले की या सर्व महिलांनी ग्लायऑक्सिलिक ऍसिड आधारित हेयर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट करून घेतले होते. असे मानले जात आहे की हे रसायन शरीरात जाऊन किडणीवर वाईट परिणाम करू शकते.
कसा करावा बचाव
काही देशांमध्ये ग्लायऑक्सिलिक ऍसिड असलेल्या हेयर प्रॉडक्ट्सवर बंदी घालण्यात आली आहे, तरीही सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही रासायनिक प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याच्या दुष्परिणामांची पूर्ण माहिती घ्या. हेअर स्ट्रेटनिंग दरम्यान रसायन थेट टाळू किंवा केसांच्या मुळांवर लावणे टाळा. किमान १.५ सेंटीमीटर अंतर ठेवा. याशिवाय, हेअरड्रेसर आणि क्लायंट दोघांनीही लक्ष ठेवावे की प्रॉडक्ट जास्त गरम करू नये आणि दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावे.
