
मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : 90 च्या दशकात तिचे काळेभोर डोळे, सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी काजोल (Kajol) हिचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस. वयाच्या 48 व्या वर्षी ती आजही तितकीच सुंदर आणि फिट (beauty and fitness) आहे. बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या काजोलचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिच्या सौंदर्याने तिने सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले आहे. काजोलने स्वत:ला इतकं छान मेंटेन केले आहे की तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे.
आपल्या अभिनयाने लाखोंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या काजोलचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ती तिचे सौंदर्य आणि फिटनेस याबद्दल जास्त बोलत नसली तरी काही मुलाखतींमध्ये तिने काही गोष्टी सांगितल्या होत्या. तिच्या फिटनेसचं सिक्रेट काय आहे, चला जाणून घेऊया..
पिते भरपूर पाणी
काजोलच्या चमकदार त्वचेचे आणि तंदुरुस्त शरीराचे रहस्य पाणी. ती भरपूर पाणी पिते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. जे वजन नियंत्रणात राखण्यासही मदत करते.
खाण्या-पिण्याकडे देते विशेष लक्ष
काजोल तिच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक असते आणि म्हणूनच ती जेवणाकडे विशेष लक्ष देते, कुठे, कधी (वेळ) आणि किती खात आहोत, याकडे तिचे बारीक लक्ष असते. ती संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करते आणि जंक फूड खाणे टाळते.
वर्कआउट करते स्ट्रिक्टली फॉलो
तिच्या वर्कआऊटबद्दल सांगायचे झाले तर काजोल तिच्या ट्रेनरने दिलेल्या सूचनांनुसार रुटीन फॉलो करते आणि तिचं वर्कआऊट, व्यायाम कधीच मिस करत नाही. त्यामुळे तिचे फिजिक मेंटेन आहे. वर्कआऊटसोबतच ती नृत्य करूनही फिटनेस राखण्याचा प्रयत्न करते.
स्किन केअरची घेते विशेष काळजी
फिटनेस आणि सौंदर्य काय राखण्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा काजोलचा प्रयत्न असतो. तसेच ती स्किन केअरकडेही खूप बारकाईने लक्ष देते. याचमुळे वयाच्या 48 व्या वर्षीही काजोल बरीच तरूण दिसते.
कामाबद्दल सांगायचं झालं तर काजोलने आता ओटीटीवरही पदार्पण केले असून तिच्या ‘लस्ट स्टोरीज 2’ आणि ‘ द ट्रायल’ ला चांगला प्रतिसाद मिळाला होता.