Diwali 2025 Wishes : सण दिव्यांचा, दरवळला सुगंध फराळाचा… दिवाळीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा

दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो, जो घरात आनंद आणि सकारात्मकता आणतो. दिव्यांची रोषणाई, आकर्षक आकाशकंदील आणि सुंदर रांगोळ्यांनी सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. या मंगलमय प्रसंगी फराळाची देवाणघेवाण करून, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना खास शुभेच्छा संदेश पाठवून हा आनंद द्विगुणीत करा. येथे तुम्हाला खास दिवाळी शुभेच्छा मिळतील.

Diwali 2025 Wishes : सण दिव्यांचा, दरवळला सुगंध फराळाचा... दिवाळीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा
| Updated on: Oct 20, 2025 | 8:49 AM

आज राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजय दर्शवणारा सण म्हणून दिवाळीला ओळखले जाते. हा सण प्रत्येक घरात चैतन्य आणि सकारात्मकता घेऊन येतो. दिवाळीच्या निमित्ताने सध्या सर्वत्र घराघरात पणत्यांची रोषणाई, दारावर आकर्षक आकाशकंदील आणि अंगणात काढलेल्या सुंदर रांगोळ्या असे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे.

दिवाळीचा हा सण केवळ फक्त दिव्यांपुरती मर्यादित नसतो. यानिमित्ताने फराळाची देवाणघेवाण केली जाते. दिवाळीच्या मंगलमय दिनाच्या निमित्ताने सर्वजण नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना शुभेच्छा देत असतात. त्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला तुमच्या खास व्यक्तींना शुभेच्छा पाठ्वण्यासाठी काही खास शुभेच्छा देत आहोत. या शुभेच्छा वाचून तुमच्यासह तुमचे प्रियजनही आनंदी होतील.

पारंपारिक शुभेच्छा

  • “उटण्याचा सुगंध, दिव्यांची रोषणाई, फराळाची चव आणि नात्यांचा गोडवा… ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!”
  • “धन, आरोग्य, आणि मांगल्याचा प्रकाश घेऊन आलेल्या या दीपोत्सवात, तुमच्या जीवनातील सारे अंधकार दूर होवोत. ही दिवाळी तुमच्यासाठी सुवर्ण ठरो. शुभ दीपावली!”
  • “लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊन येवो नवी उमेद, नवी आशा. तुमच्या जीवनात सदैव आनंद आणि भरभराट नांदो! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!”
  • “नवी स्वप्ने, नवी क्षितिजे घेऊन येवो ही दिवाळी. तुमच्या ध्येय-प्रयत्नांना दिव्य यशाची झळाळी मिळो. आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो ही दीपावली! हार्दिक शुभेच्छा!”
  • “अंधारमय अनुभव पुसून टाका, नवा प्रकाश, नव्या ऊर्जा आणि नव्या आठवणी घेऊन ही दिवाळी साजरी करा! शुभ दीपावली!”
  • “संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा. प्रकाशाच्या या उत्सवात तुमचे जीवन आनंदमय होवो!”

थोडक्यात आणि मॉर्डन शुभेच्छा

  • सण दिव्यांचा, दरवळला सुगंध फराळाचा! दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!
  • आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपल्या घरी. शुभ दीपावली!
  • सुख-समृद्धी, प्रेम आणि चैतन्य लाभो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
  • या दिवाळीत फक्त आनंद नांदो, दुःख, काळजी राहो दूर. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
  • नात्यांमधील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा! तुमचा सहवास आणि प्रेम असेच कायम राहो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
  • फटाक्यांची धूम, दिव्यांची रोषणाई… या सणासारखीच आपल्या नात्यातील गोडी वाढत राहो! दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली… नवस्वप्नांची करीत पखरण, सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली! तेजोमयी शुभेच्छा!”
  • सडा घालून अंगणी, रंग भरले रांगोळीत; झेंडूच्या फुलांचे तोरण, दिवा शोभतो दिवाळीत. ही दिवाळी आपणास सुखकारक आणि समृद्धीची जावो!