Happy New Year 2022 : जानेवारीत उजाडत नव्हतं नववर्ष; डिसेंबरनंतर यायचा ‘हा’ महिना!

रोमचा सम्राट राजा रोमुलसनं (Romulus) रोमन कॅलेंडरची निर्मिती केली होती. इ. स. पूर्व 753 हा कॅलेंडरचा निर्मिती काळ मानला जातो. या कॅलेंडरची रचना विशिष्ट होती. एका वर्षात 12 महिन्यांचा समावेश नव्हता.

Happy New Year 2022 : जानेवारीत उजाडत नव्हतं नववर्ष; डिसेंबरनंतर यायचा ‘हा’ महिना!
Calender
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 10:11 PM

डिसेंबर महिन्यानंतर जानेवारीनं नव्या वर्षाची सुरुवात होते. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च अशाक्रमानं 12 महिने येतात आणि पुन्हा जानेवारीने नववर्ष उजाडतं. महिन्याचं चक्र असंच सुरू असतं. तुम्हाला माहीत आहे काही वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी महिना येत नव्हता. तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित वाटेलं कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्याचा समावेश नव्हता.

रोमचा सम्राट राजा रोमुलसनं (Romulus) रोमन कॅलेंडरची निर्मिती केली होती. इ. स. पूर्व 753 हा कॅलेंडरचा निर्मिती काळ मानला जातो. या कॅलेंडरची रचना विशिष्ट होती. एका वर्षात 12 महिन्यांचा समावेश नव्हता. यापूर्वी कशी स्थिती होती आणि डिसेंबरच्या नंतर कोणता महिना होता आणि जानेवारी ऐवजी कोणत्या महिन्याचं स्थान होतं?

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल सुरुवातीला एका वर्षात 10 महिने होते आणि वर्षाची सुरुवात मार्च महिन्यानं होत असे. मात्र, वर्षाचा शेवट डिसेंबर महिन्यानंच होत आणि डिसेंबरनंतर थेट मार्च महिनाच उजाडत असे. कालांतरानं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा समावेश करण्यात आला. इ. स. 153मध्ये जानेवारी महिन्याची सुरुवात झाली. त्यापूर्वी 1 मार्च हा वर्षातील पहिला दिवस होता.

जानेवारी महिन्याची कहाणी निराळीच आहे. जानेवारीचं नाव रोमन देवता जेनसच्या नावावर आधारीत आहे. या देवतेनं स्वर्गाचा दरवाजा उघडला आणि बंद केला होता, अशी अख्यायिका सांगितली जाते. आरंभ आणि अंताची देवता मानली जाते. त्यामुळे जानेवारी हे नाव सर्वश्रृत झालं.

फेब्रुवारी-हिवाळा संपल्यानंतर आणि मार्चपूर्वी रोमनमध्ये फब्रुआ नावाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवरून तो लोकप्रिय आहे.

सर्वप्रथम सप्टेंबर 7, ऑक्टोबर 8 आणि नोव्हेंबर 9 येत होते. आता 2 स्थानांची भर पडली आहे.

Eating Bad Habit | रोज खात असाल पांढरे ब्रेड, तर सावध व्हा; या आजारांना देत आहात आमंत्रण!

Work Tips: काम संपल्यानंतर थकवा येतोय? मग या टिप्स वाचाच

New year resolution ideas 2022 : पर्याप्त झोप ते स्वतःसाठी वेळ, निरामय आनंदाचे ‘5’ नवसंकल्प!