Work Tips: काम संपल्यानंतर थकवा येतोय? मग या टिप्स वाचाच
कोरोना असल्यानं बहुतेक कर्मचारी वर्क फ्राम होम करतात. याचे काही नुकसानही आहेत. घरी एकाच ठिकाणी बसून काम केल्यानं थकवा येतो. जर तुम्हाला असं वाटत असेल, तर खालील टिप्स फॉलो करा आणि थकवा पळवा...

थोड्या वेळानंतर काम - वर्क फ्राम होम असो की, कामाचे तास मध्यंतरी ब्रेक घेणे आवश्यक आहे. शरीरासाठी ब्रेक आवश्यक आहे. यासाठी हे जरूर करा.

शॉवर घेऊ शकता – काम करून थकवा दूर करण्यासाठी शॉवर घेणे चांगला पर्याय आहे. यामुळं शरीराला अतिशय फ्रेश वाटते. तसेच तुमचा मूडही चांगला होतो.

15 मिनिटांची झोप – कामानंतर काही वेळासाठी झोप घेतली पाहिजे. खरं पाहीलं तर फार कमी लोकं असं करतात. कमीत-कमी 15 मिनिटांची एक डुलकी घेतली तर थकवा दूर पळतो.

केसांची मसाज – डोक्याला शांती पाहिजे असेल, तर शरीराशी संबंधित काही समस्या दूर करू शकता. डोक्याला शांत करण्यासाठी केसांची मसाज चांगली मानली जाते. अशाप्रकारे तुम्ही थकवा दूर करू शकता.
