Broccoli Benefits | हिवाळ्यात ब्रोकोली खाण्याचे प्रचंड फायदे, अनेक आजारांत ठरेल लाभदायी!

| Updated on: Jan 20, 2021 | 12:07 PM

ब्रोकोली लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आणि क्रोमियमचा उत्कृष्ट स्रोत आहे.

Broccoli Benefits | हिवाळ्यात ब्रोकोली खाण्याचे प्रचंड फायदे, अनेक आजारांत ठरेल लाभदायी!
Follow us on

मुंबई : थंडीच्या दिवसांत ‘ब्रोकली’ बाजारात भरपूर प्रमाणात विक्रीसाठी दिसतात. ‘ब्रोकोली’ची सुपर फूडमध्ये गणना केली जाते. हिरव्या फ्लॉवरप्रमाणे दिसणारा ‘ब्रोकोली’ आपण दोन प्रकारे खाऊ शकता. एक म्हणजे ब्रोकोली पूर्णपणे शिजवू शकतो, तर दुसरी पद्धत म्हणजे त्याला हलकी स्टीम देऊन खाऊ शकता. ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यात बरीच जीवनसत्त्वे देखील आढळतात. ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात, जे कर्करोगापासून आपला बचाव करतात. ब्रोकोली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे (Health Benefits of broccoli during winter season).

ब्रोकोली खाण्याचे फायदे :

पोषक तत्वांचा खजिना ब्रोकोली

ब्रोकोली लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आणि क्रोमियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. यात इंडोल्ड 3 कार्बिनॉल देखील आहे, जो शरीरातील अ‍ॅक्रेल हायड्रोकार्बन रिसेप्टर नावाच्या प्रोटीनला सक्रिय करतो. हे घटक आपल्या शरीरास कर्करोगापासून सुरक्षित ठेवतात.

हृदयासाठी फायदेशीर

ही भाजी आपल्या हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यात कार्टेनोइड्स ल्यूटिन असते, जे रक्तवाहिन्या निरोगी राखण्यास उपयुक्त आहे. यामुळे हृदयाच्या इतर समस्येपासून देखील बचाव होतो (Health Benefits of broccoli during winter season).

कर्करोगाचा धोका कमी होतो.

ब्रोकोलीमध्ये फायटोकेमिकलचे प्रमाण जास्त आहे, जे आपल्या शरीराचे कर्करोगापासून संरक्षण करते. हे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते. ब्रोकोलीमध्ये असलेले घटक शरीर डिटॉक्सिफाय करतात, ज्यामुळे आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते.

वजन नियंत्रित होते.

आपण आपले वजन नियंत्रित ठेवू इच्छित असल्यास नाश्त्यामध्ये ‘ब्रोकोली’ सलाड म्हणून खा. यामध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असतात, जे आपले वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. आपण सूप करून देखील ब्रोकोलीचे सेवन करू शकता. त्यात खूप कमी कॅलरी असतात.

प्रतिकारशक्ती मजबूत होते.

व्हिटामिन सी समृद्ध ब्रोकोली आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देण्यास सक्षम आहे. ब्रोकोली आपल्याला बर्‍याच प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवतो. तसेच हिवाळ्याच्या काळात शरीराला आतून उबदार ठेवून, थंडीपासून शरीराचे संरक्षण करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of broccoli during winter season)

हेही वाचा :