साबुदाणे खायला आवडतात? पण या लोकांनी दोन हात लांबच रहा, नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम

शक्यतो उपवासाला सर्रासपणे साबुदाणा खिचडी खाण्याला प्राधान्य दिले जात असते. सर्वसामान्यपणे साबुदाणा हा काही प्रमाणात शरीरासाठी चांगला असला तरी काही लोकांना त्यापासून दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. अशा लोकांना साबुदाण्यापासून दूर राहिलेलेच बरे...

साबुदाणे खायला आवडतात? पण या लोकांनी दोन हात लांबच रहा, नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम
sabudana
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:53 AM

मुंबई : अनेकांना साबुदाणा (Sabudana) खिचडी किंवा साबुदाण्यापासून तयार पदार्थ खायला आवडत असतात. उपवासाला तर पोट भरुन साबुदाणा खिचडीचे सेवन केले जात असते. खिचडीशिवायही अनेक पध्दतीने साबूदाण्यापासून विविध पदार्थ तयार केले जात असतात. त्यात प्रामुख्याने साबुदाणा वडे दह्यासोबत खाल्ले जात असतात. अतिशय चविष्ट (Tasty) असल्याने काही वेळा याचा अतिरेकही होत असतो. निरोगी व्यक्तीने साबुदाणा खायला काही हरकत नसली तरी असे काही लोक आहेत, ज्यांनी साबुदाणा खाताना विचार करुन सेवन केले पाहिजे. साबुदाण्यात असे अनेक घटक असतात जे काही वेळा आपल्या शरीराला नुकसान (disadvantages) पोहचवू शकतात. त्यामुळे अशा वेळी साबुदाणा वगळून सुका मेवा, भगर, फळे, राजगिरा, खजूर अशा पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरत असते. कोणत्या लोकांनी साबुदाण्यापासून दूर रहावे ते जाणून घेणार आहोत.

1) लठ्ठपणाची समस्या

ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे. अशा लोकांना साबुदाणा व त्यापासून तयार होत असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. साबुदाणामध्ये भरपूर प्रमाणात चरबी आणि प्रथिने असतात. साबुदाणा खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज्‌ मोठ्या प्रमाणात वाढत असतात. त्यामुळे ज्यांना आधिच लठ्ठपणाची समस्या असेल, त्यांनी आपल्या आहारातून साबुदाणा वगळणे योग्य ठरते.

2) मधुमेही

तज्ज्ञांच्या मते, साबुदाणामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स नसतो आणि जर त्याचे दररोज सेवन केले तर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साबुदाणा अजिबात खाऊ नये, साबुदाणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अजून वाढू लागते.

3) मुतखडा

ज्या लोकांना आधीपासूनच मुतखड्याचा त्रास आहे, त्या लोकांनी साबुदाण्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते साबुदाण्यामुळे ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे साबुदाणा आपल्या आहारातून वगळणे योग्य.

4) मेंदूवर दुष्परिणाम

साबुदाणामध्ये सायनाईडचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले असले तरी त्याचे अतिसेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे याचा मेंदुवर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती आणखी बिघडली तर व्यक्ती कोमात देखील जाउ शकतो.

5) हृदयरोगी

साबुदाणामध्ये अतिरिक्त चरबी असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते ज्यांना आधिच ह्रदयाशी संबंधित आजार आहे, अशा लोकांनी साबुदाणा खाल्ल्यास त्याना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे अशा वेळी ह्रदयाचा झटका येण्याचा प्रकारही वाढू शकतो.

6) छातीत जळजळ

ज्या लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे, अशा लोकांनी साबुदाणा खाण्यापासून लांब रहावे, कारण यामुळे त्यांची समस्या अधिकच वाढू शकते.

7) पोटाचे आजार

पचनासंबंधित आजार, किंवा वारंवार पोट खराब होण्याची तक्रार असलेल्यांनीही साबूदाणा न खाल्लेला बरा असतो. कारण साबुदाणा पचायला जड समजला होतो. त्यामुळे पोटाचे आजार असलेल्या लोकांनी त्याचे सेवन टाळले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

लव्ह मॅरेज असून सुद्धा नात्यात गोडवा टिकत नसेल तर प्रत्येक पार्टनरने जाणून घ्यायला हव्यात काही टिप्स, तुटलेले नाते पुन्हा जुळेल!!

उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा… पोटाच्या समस्यांपासून दूर रहा

असे तयार करा ‘होम मेड फेसवॉश’, त्वचेच्या सर्व समस्या होतील दूर

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.