उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा… पोटाच्या समस्यांपासून दूर रहा

हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. उन्हाळ्यात अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. या सर्वांमध्ये शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहारातदेखील काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते.

उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा... पोटाच्या समस्यांपासून दूर रहा
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 2:07 PM

हिवाळा संपत आला असून उन्हाळ्याची (summer) सुरुवात होत आहे. ऋतूमानानुसार आपल्या शरीरालादेखील नव्या ऋतूची सवय करुन घ्यायला काहीसा वेळ लागत असतो. बदलत्या ऋतूनुसार अनेक शारीरिक बदलदेखील होत असतात. त्यानुसार आपण आपला आहार (diet) तसेच एकंदर जीवनपध्दती न ठेवल्यास याचे शरीरावर अनेकदा दुष्परिणामदेखील बघायला मिळत असतात. उन्हाळ्यात राहणीमानापासून ते खाण्यापर्यंत सर्व काही बदलते. ऋतूनुसार शरीराच्या तापमानातही बदल होतात, अशा स्थितीत शरीराला हलके आणि पचनक्रियेला सोपे जाईल असे अन्न हवे असते, यातून पोटाच्या समस्यादेखील दूर होत असतात. उन्हाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ पोटाच्या समस्या निर्माण करु शकतात. आयुर्वेदात अर्ध्या रोगांचे मूळ पोटाला (Stomach) सांगितले आहे. जर तुम्हाला आजारांपासून दूर ठेवायचे असेल तर पोटाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असतो. पोटाच्या समस्या वारंवार डोके वर काढत असतील तर, आहारात काही बदल करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात ही 5 पदार्थ आपल्या आहारात असणे आवश्‍यक आहे.

आवळ्याचा मुरब्बा

आवळा पोटासाठी खूप चांगला असतो. आवळ्याच्या सेवनामुळे गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता आदी समस्या असतील, त्यांनी उन्हाळ्यात रोज आवळ्याच्या मुरब्ब्याचे सेवन करावे. आवळ्याचा मुरब्बा फायबरने समृद्ध आणि थंड आहे. हे खाल्ल्याने आतडे निरोगी राहतात. आवळ्याचा मुरब्बा सकाळी रिकाम्या पोटी खावा. ते खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये, यातून पोटाचे आरोग्य निरोगी राहते.

सर्वांना आवडणारी खिचडी

घरात अस कुणीही नाही ज्यांना खिचडी आवडत नाही. वेळेची बचत करायची असेल त्यावेळी आवर्जुन खिचडी बनवली जात असते. खिचडी अतिशय फायदेशीर, हलकी आणि पचायला सोपी आहे. हे पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. याशिवाय खिचडीमुळे पोटाच्या इतर समस्याही दूर होतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खिचडीमध्ये काही भाज्याही वापरू शकता. जर तुम्हाला रोज खिचडी खायला आवडत नसेल तर आठवड्यातून किमान एक-दोन दिवस तरी खिचडी जरूर खावी.

दही

दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त असतात. ते खाल्ल्याने गॅस, अॅसिडीटी आदी समस्या होत नाहीत.

इडली

इडली ही पचायला अतिशय हलकी असते. इडली खासकरुन दक्षिण भारतात सर्वाधिक प्रसिध्द असली तरी आता हा पदार्थ भारतात सर्वत्र मोठ्या आवडीने खाल्ला जातो. इडलीत मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. शिवाय लवकर पचत असल्याने पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. बहुतांश ठिकाणी रव्यापासून इडली बनवली जाते, त्यामुळे ती खायला खूप चविष्ट लागते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा इडली जरूर खावी.

मूगाची डाळ

उन्हाळ्यात मूगाच्या डाळीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेली मूगाची डाळ पचायला हलकी असते. अनेकदा आजारपणात मुगाच्या डाळीचे सेवन केले जात असते. तसेच मोड आलेले हिरवे मूगदेखील अतिशय उत्तम नाश्‍ता मानला जातो.

Russia Ukraine War Live : रशियात फेसबूकवर बंदी

Nagpur | युक्रेनमध्ये अडकलेल्या किती जणांशी सरकारचा संपर्क? विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था काय

विदर्भातील 41 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, पालक चिंतेत! प्रशासनाने जारी केले हेल्पलाईन नंबर

Non Stop LIVE Update
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.