Power Nap | अपुरी झोप शरीरासाठी घातक, महिलांना होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, आताच सावध व्हा!

| Updated on: Oct 16, 2021 | 9:35 AM

वाईट जीवनशैलीमुळे, पुरेशी झोप न मिळण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण ही समस्या तुमचे मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यही बिघडवते. शरीर आणि मनाच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे.

Power Nap | अपुरी झोप शरीरासाठी घातक, महिलांना होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, आताच सावध व्हा!
sleep
Follow us on

मुंबई :  वाईट जीवनशैलीमुळे, पुरेशी झोप न मिळण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण ही समस्या तुमचे मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यही बिघडवते. शरीर आणि मनाच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला निरोगी शरीरासाठी किमान 7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. ‘

वास्तविक, झोपेत असताना, आपले शरीर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य ठीक करण्याचे काम करते. यामुळे सर्व समस्या दूर होतात. हेच कारण आहे की झोपेतून उठल्यानंतर आपल्याला ताजे वाटते. पण आजकालच्या जगात, कामाचा दबाव इतका जास्त आहे की लोकांना शांत झोप घेता येत नाही.

याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागण्याच्या सवयीमुळे लोकांची झोप देखील विस्कळीत झाली आहे. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे, लोकांमध्ये तणावाची समस्या खूप सामान्य होत आहे. याच समस्येमुळे शरीरावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. यामुळे लोक वेळेपूर्वी सर्व प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊया झोपेच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते

आपल्या शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. झोपेचा अभाव रोग प्रतिकारशक्ती कमकुवत करतो. जर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर ,खोकला, सर्दी, ताप यांसारखे आजार आपल्याला लवकर होतात.

ताण आणि नैराश्य

झोपेच्या अभावामुळे ताण येतो. तणावामुळे एखादी व्यक्ती योग्यरित्या कोणतेही काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि हळूहळू ती व्यक्ती नैराश्यात जाऊ लागते.

महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका

एका संशोधनात असे दिसून आले आहे की झोपेचा अभावा महिलांच्या पेशींना नुकसान करतो. यामुळे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयाची समस्या

कमी झोप आपल्या शरीराच्या चयापचय दरावर परिणाम करते. यामुळे, शरीराचे वजन वाढते आणि वेळेपूर्वी व्यक्ती मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांनी ग्रस्त होऊ लागते.

हार्मोनल असंतुलन

झोपेचा अभाव हार्मोनल असंतुलन देखील होऊ शकतो. हार्मोनल असंतुलनामुळे, चिडचिडेपणा, मासिक पाळी अनियमितता, मनःस्थिती बदलणे, लठ्ठपणा, थकवा यासारख्या अनेक समस्या स्त्रियांमध्ये दिसतात. याशिवाय व्यक्तीची स्मरणशक्तीही कमकुवत होऊ लागते.

इतर बातम्या :

Healthy Heart Tips | दररोज 5 उपाय करा, हृदयरोग आसपास फिरकणारही नाही!

Weight Loss : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय अत्यंत फायदेशीर, वाचा!

Weight Loss : झटपट वजन कमी करायचे असेल तर गुलाबाच्या चहाचे सेवन करा!