Weight Loss : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय अत्यंत फायदेशीर, वाचा!

वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की मदत होईल.

Weight Loss : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'हे' खास पेय अत्यंत फायदेशीर, वाचा!
वाढलेले वजन

मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की मदत होईल. यासाठी तुम्हाला काकडी लागणार आहे.

साहित्य-

-काकडी

-पाणी

-लिंबू

-मध

-काळे मीठ

वाढलेले वजन कमी करण्यासाठी काकडीचे खास पेय अत्यंत फायदेशीर आहे. हे पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक काकडी एक ग्लास पाणी, लिंबू, एक चमचा मध आणि अर्धा चमचा काळे मीठ लागणार आहे. काकडी बारीक करून घ्या. त्यानतंर त्यामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा. सर्व मिश्रण एक जीव करा. हे खास पेय दिवसातून तीन वेळा पिले पाहिजे. हे वजन झटपट कमी करण्यास मदत करते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी, जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय घेतले पाहिजे. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल. हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपण 2 चमचे जिरे, 3 चमचे धने आणि 2 चमचे बडीशेप घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिक्स करा. हे गॅसवर वीस मिनिटे उकळूद्या आणि गरमा-गरम प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

हे पेय आपण दररोज सकाळीच घेतले पाहिजे. जर हे खास पेय आपण दररोज घेतले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. जिरेमध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक अॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक अॅसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. जिरे केवळ व्हिटॅमिन ई भरलेले नाही तर त्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत.

संबंधित बातम्या :

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This special drink is beneficial for reducing belly fat)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI