Healthy Heart Tips | दररोज 5 उपाय करा, हृदयरोग आसपास फिरकणारही नाही!

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगातील अनेक लोकांमध्ये हृदयरोग हा सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. हृदयरोग हे जगभरात मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे. या सर्वामध्ये वृद्ध व्यक्तींना हृदयरोगाची अधिक शक्यता असते.

Healthy Heart Tips | दररोज 5 उपाय करा, हृदयरोग आसपास फिरकणारही नाही!
heart

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगातील अनेक लोकांमध्ये हृदयरोग हा सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. हृदयरोग हे जगभरात मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे. या सर्वामध्ये वृद्ध व्यक्तींना हृदयरोगाची अधिक शक्यता असते, तर बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडच्या काळात तरुणांमध्ये कार्डियाक अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासांनी तरुण रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे कारण जीवनशैलीत झालेला बदल सांगितले आहेत.

रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करा

हृदयाच्या निरोगी कार्यासाठी, आपण आपले रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे आहे. उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी हृदयविकाराचा धोका वाढवू शकते, ज्यात स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि बऱ्याच गोष्टींचा समाविष्ट आहे. ब्लड प्रेशर मॉनिटरच्या मदतीने क्लिनिकमध्ये किंवा घरी रक्तदाब तपासला जाऊ शकतो, तर रक्ताच्या चाचणीद्वारे तुम्ही तुमचे कोलेस्टेरॉल तपासू शकता.

नियमित व्यायाम करा

एका सर्वेनुसार, दीर्घकाळ बसणे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारखा आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम सुरू करा. रोज व्यायाम केल्यानंतर हळूहळू व्यायामाचे तास वाढवा.

निरोगी आहाराचे सेवन

निरोगी हृदयसाठी फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळा. फॅटमुळे स्ट्रोकसह हृदयरोगाचा धोका वाढतो. अन्नातील हे फॅटस तुमच्या खराब कोलेस्टेरॉलची पातळी (LDL) वाढवते आणि तुमच्या चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी (HDL) कमी करते. त्याचा तुमच्या हृदयावर अनेक प्रकारे परिणाम होतो. निरोगी हृदयासाठी तुम्ही आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि फायबर युक्त पदार्थांचा समावेश करू शकता. त्यांचा एकूण आरोग्यालाही फायदा होतो.

निरोगी वजन राखणे

बॉडी इंडेक्स मास एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त आहे की कमी आहे. हे तपासले जावू शकते. आपण नियमित व्यायाम करुन आपल्या बॉडी इंडेक्स मास प्रमाणे आपले वजन आटोक्यात आणू शकतो.

मद्यपान, धूम्रपान, तणाव पातळी नियंत्रित करा

जास्त धूम्रपान आणि मद्यपान केल्याने तुमच्या हृदयावर घातक परिणाम होतो. मद्यपान, धूम्रपानमुळे तुमचे रक्तदाब आणि रक्तातील ट्रायग्लिसराईड्सची पातळी वाढवतात, ज्यामुळे तुम्हाला स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच, जास्त ताण घेतल्याने तुमच्या हृदयावर खूप ताण येतो. म्हणून, तणाव पातळी कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी योग किंवा ध्यान करा. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले होईल.

इतर बातम्या :

Weight Loss : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय अत्यंत फायदेशीर, वाचा!

Weight Loss : झटपट वजन कमी करायचे असेल तर गुलाबाच्या चहाचे सेवन करा! 

Health Tips : डेंग्यूपासून ते कावीळपर्यंत गिलोय फायदेशीर, कसे वापरावे ते वाचा! 

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI