Health Tips : डेंग्यूपासून ते कावीळपर्यंत गिलोय फायदेशीर, कसे वापरावे ते वाचा! 

सध्या डेंग्यूचे रूग्ण हे वाढत आहेत. त्याचबरोबर हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप, मलेरिया इत्यादी इतर हंगामी आजारांचा धोकाही वाढला आहे. याशिवाय जे लोक दम्याचे रुग्ण आहेत. त्यांनीही या हंगामात सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण हिवाळा जसजसा जवळ येतो तसतसे दम्याच्या रुग्णांच्या समस्याही वाढतात.

Health Tips : डेंग्यूपासून ते कावीळपर्यंत गिलोय फायदेशीर, कसे वापरावे ते वाचा! 
आरोग्य

मुंबई : सध्या डेंग्यूचे रूग्ण हे वाढत आहेत. त्याचबरोबर हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप, मलेरिया इत्यादी इतर हंगामी आजारांचा धोकाही वाढला आहे. याशिवाय जे लोक दम्याचे रुग्ण आहेत. त्यांनीही या हंगामात सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण हिवाळा जसजसा जवळ येतो तसतसे दम्याच्या रुग्णांच्या समस्याही वाढतात.

या सर्व समस्यांच्या दरम्यान गिलोयचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. गिलोय कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस समृध्द ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जी आयुर्वेदात जीवनरक्षक औषधी मानली जाते. हे व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्व रोगांपासून संरक्षण करते. गिलोयचे फायदे आणि ते कसे वापरावे ते जाणून घ्या.

रोगप्रतिकारक शक्ती

गिलोय हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. गिलोयचा काढा व्हायरस आणि हंगामी रोगांमुळे संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. हे रोज प्यायल्याने सर्दी -पडसे सारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

दम्यासाठी फायदेशीर

गिलोयमध्ये मोठ्या प्रमाणावर दाहक-विरोधी घटक असतात. म्हणून दमा आणि श्वसनाच्या इतर समस्या नियंत्रित करण्यासाठी हे खूप प्रभावी मानले जाते. गिलोयच्या नियमित सेवनाने फुफ्फुसे स्वच्छ होतात आणि कफ जमा होण्यास प्रतिबंध होतो.

रक्त शुद्ध करते

अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध गिलोयला रक्त शुद्ध करणारे मानले जाते. हे शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि रक्त शुद्ध करते. त्याचे नियमित सेवन त्वचेच्या समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे.

कावीळमध्ये फायदेशीर

काविळच्या रुग्णांसाठी गिलोय खूप फायदेशीर मानले जाते. त्याच्या पानांचा रस प्यायल्याने खूप आराम मिळतो. गिलोयचा डेकोक्शन बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास देखील उपयुक्त आहे.

डेंग्यूच्या रुग्णांसाठी फायदेशीर

डेंग्यू दरम्यान रुग्णानी दररोज गिलोयचा काढा द्यावा. त्याच्या सेवनामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि प्लेटलेट्स देखील झपाट्याने वाढतात आणि ताप नियंत्रित होतो.

गिलोयचा काढा कसा बनवायचा

सर्वप्रथम गिलोयचे स्टेम तोडणे. ते धुवून ठेचून घ्या आणि एका ग्लास पाण्यात टाका. यात तुळशीची पाने, काळी मिरी, थोडे आले आणि एक चिमूटभर हळद घाला. त्यानंतर पाणी उकळू द्या. पाणी अर्धे राहिल्यावर गाळून घ्या आणि गरम प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मधही मिसळू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Extremely beneficial for giloy health)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI