Health Care | गर्भावस्थेदरम्यान अपचन-गॅसच्या समस्यने त्रस्त? मग, ‘हे’ उपाय येतील कामी!

| Updated on: Feb 23, 2021 | 10:38 AM

पोट फुगी, गॅस, अपचन किंवा खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता होण्याची समस्या गरोदरपणात सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान पाचन तंत्र कमकुवत झाल्यामुळे स्त्रियांमध्ये या समस्या उद्भवतात. (Home remedies gas acidity)

Health Care | गर्भावस्थेदरम्यान अपचन-गॅसच्या समस्यने त्रस्त? मग, ‘हे’ उपाय येतील कामी!
गर्भावस्थेदरम्यान अपचन-गॅसच्या समस्यने त्रस्त?
Follow us on

मुंबई : गरोदरपणात स्त्रीयांच्या शरीरात बरेच बदल होतात. या दरम्यान त्यांना अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. पोट फुगी, गॅस, अपचन किंवा खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता होण्याची समस्या गरोदरपणात सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान पाचन तंत्र कमकुवत झाल्यामुळे स्त्रियांमध्ये या समस्या उद्भवतात. गर्भधारणेदरम्यान या समस्यांपासून पूर्णपणे मुक्त होणे कठीण आहे. परंतु, काही उपायांद्वारे ही समस्या बर्‍याच प्रमाणात नियंत्रित केली जाऊ शकते (Home remedies on gas acidity during pregnancy).

‘हे’ उपाय करून पाहा!

– एकदाच भरपूर जेवण खाण्याऐवजी, दिवसातून थोडे थोडे खावे आणि चांगले पौष्टिक अन्न खावे. या दरम्यान  आपण नोकरी करत असल्यास, नेहमी आपल्याबरोबर हेल्दी स्नॅक्स ठेवा.

– हलके अन्न खा. चमचमीत आणि मसालेदार अन्न पचवण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून असे अन्न खाणे टाळा. याशिवाय सोडा, प्रोसेस्ड फूड, मांसाहार वगैरे खाणे देखील टाळा.

– सैल आणि आरामदायक कपडे परिधान करा. विशेषत: या काळात जे काही कपडे वापरायचे आहेत, ते कंबर आणि छातीवर घट्ट नसावेत.

– दररोज जास्तीत जास्त प्रमाणात पाणी आणि इतर द्रव पदार्थ सेवन करावेत. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही. रात्री झोपायच्या दोन तास आधी जेवून घ्या (Home remedies on gas acidity during pregnancy).

– सफरचंद अपचन समस्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शक्य असल्यास दररोज एखादे सफरचंद खा. जर, आपण सफरचंद खात नसाल, तर डाळिंब किंवा इतर लोहयुक्त फळे खा.

– या दिवसांत चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा. शक्य असल्यास या वेळेस ते पूर्णपणे टाळा. कारण त्यांच्यामुळे अपचन, गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

– डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित व्यायाम करा. या व्यतिरिक्त चालण्याचा व्यायाम. विशेषत: सकाळी आणि रात्री जेवणानंतर थोडा वेळ नक्कीच चाला. हे अन्नास सहज पचवेल आणि गॅस, आम्लपित्त, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम देईल.

– एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून घ्या. आता त्यात मध घालून, पाणी उकळवून चहा बनवा. जेव्हा पाणी उकळेल, त्यानंतर ते थंड होऊ द्या. त्यानंतर हे पाणी घोट-घोट प्या. यामुळे पाचक प्रणाली सुधारते.

– जर आणखी समस्या असतील तर त्याबद्दल तज्ञांना सांगा. शक्य असल्यास स्वत:साठी डाएट चार्ट बनवा आणि प्रामाणिकपणे त्याचे अनुसरण करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Home remedies on gas acidity during pregnancy)

हेही वाचा :