‘या’ घरगुती उपायाचा अवलंब करून काही मिनिटांतच घरातील मुंग्या होतील गायब

घरातील मुंग्यांनी त्रस्त झाले आहे तर तुम्ही नैसर्गिक रित्या या उपायांचा अवलंब करून सुटका मिळवू शकता. त्यानंतर घरात पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही. चला तर मग या घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात...

या घरगुती उपायाचा अवलंब करून काही मिनिटांतच घरातील मुंग्या होतील गायब
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Oct 07, 2025 | 2:51 PM

पावसाळा सुरू झाल्याने वातावरणात दमटपणा येतो. यामुळे अशा वातावरणात घरांमध्ये मुंग्या दिसणे सामान्य आहे. पण कधीकधी एका कोपऱ्यात खूप लाल किंवा काळ्या मुंग्या जमू लागतात. त्या काढून टाकल्यानंतरही तिथे मुंग्या पुन्हा येतात. अशातच आपण अनेक उपाय करत असतो पण त्याचा फारसा परिणाम होत नाही. जर तुम्हाला मुंग्यांचा खरोखर त्रास होत असेल आणि त्यांना तुमच्या घरातुन काढून टाकायचे असेल तर यासाठी काही खास नैसर्गिक उपाय आहेत जे आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

सामान्यतः उघड्यावर असलेली मिठाई, साखर, ब्रेड किंवा इतर अन्नपदार्थांवर मुंग्या हल्ला करतात . याशिवाय घर स्वच्छ नसल्यामुळे देखील घरांच्या कोपऱ्यांमध्ये मुंग्या दिसू शकतात. परंतु त्यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी स्वच्छता आणि अन्न व्यवस्थित ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही हे घरगुती उपाय अवलंबू शकता.

Loading...

पुदीन्याचे तेल

मुंग्यांना घरातुन काढून टाकण्यासाठी तुम्ही पुदिन्याच्या पानांचा वापर देखील करू शकता. यासाठी, स्वच्छ प्लास्टिक स्प्रे बाटलीमध्ये 2 कप पाण्यात 10 ते 20 थेंब पुदिन्याच्या आवश्यक तेलाचे मिश्रण करा. ही मिश्रण तुमच्या घराच्या बेसबोर्ड आणि खिडक्यांभोवती स्प्रे करा. ते कोरडे होऊ द्या आणि आवश्यक असल्यास ते पुन्हा करा. अशाने मुंग्यांचा परत येत नाही.

टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईल माश्या आणि मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकते. स्वच्छ प्लास्टिक स्प्रे बाटलीमध्ये 2 कप पाण्यात 5 ते 10 थेंब टी ट्री ऑईल मिक्स करा. हे मिश्रण घराभोवती, विशेषतः जिथे तुम्हाला मुंग्या दिसतात तिथे स्प्रे करा.

पांढरा व्हिनेगर

पांढऱ्या व्हिनेगरच्या मदतीनेही मुंग्या घराबाहेर काढता येतात. यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिक्स करा आणि त्याचा वापर फरशी आणि काउंटरटॉप्सच्या पृष्ठभागावर स्वच्छ करण्यासाठी करा. जिथे जिथे मुंग्या दिसतील तिथे तुम्ही हे मिश्रण त्या ठिकाणी स्प्रे करू शकता किंवा कागद आणि कापडावर स्प्रे करून ती जागा स्वच्छ करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत

मुंग्या पदार्थांवर खूप लवकर येतात. यासाठी कोणतेही पदार्थ बाहेर ठेवू नका, तर ते हवाबंद डब्यात ठेवा. फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवा. ज्याचे झाकण हवाबंद असेल अशा डस्टबिनचा वापर करा. खिडक्या आणि दारांच्या भेगा बंद करा. घरात झाडे असतील तर त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. गोड पदार्थ उघडे ठेवू नका. जेणेकरून मुंग्या घरात येणार नाहीत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us