कोपर आणि गुडघ्यांच्या कोरड्या त्वचेला मऊ करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत

गुडघे आणि हातांचे कोपर यांची त्वचा आधीच थोडी जाड असते आणि त्यावर नैसर्गिक तेल नसते. त्यामुळे या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास या ठिकाणांची त्वचा खडबडीत आणि खूप कोरडी होते. तर आजच्या या लेखात आपण कोरडेपणा दूर करण्यासाठी काही उपाय आणि त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स जाणून घेऊयात

कोपर आणि गुडघ्यांच्या कोरड्या त्वचेला मऊ करण्यासाठी हे घरगुती उपाय करतील मदत
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 19, 2025 | 11:44 PM

आपण प्रत्येकजण चेहऱ्याची काळजी घेताना अनेक घरगुती उपाय तसेच स्किन केअर रूटिंग करत असतो. अशातच त्वचेची काळजी घेत असताना मात्र गुडघे आणि हाताचे कोपरांकडे दुर्लक्ष होते. तर या ठिकाणांच्या त्वचेची काळजी घेणे देखील खूप आवश्यक आहे, कारण ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. पायांचे गुडघे आणि हातांच्या कोपरांची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत थोडी जाड आणि कोरडी असते. कोपर आणि गुडघ्यांवर नैसर्गिक तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथी नसतात आणि या ठिकाणी जास्त घर्षण देखील होते, म्हणून योग्य काळजी न घेतल्यास कोरडेपणा आणखी वाढतो. ओलाव्याअभावी, मृत त्वचा जमा होऊ लागते.

जर कोपर आणि गुडघ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर काळेपणा देखील वाढतो. मृत त्वचा जमा झाल्यामुळे त्वचा कधीकधी खडबडीत होते. तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सोप्या सवयींचा अवलंब करून, तुम्ही कोपर आणि गुडघ्यांची त्वचा मऊ ठेवू शकता आणि त्वचेचा रंग देखील सुधारू शकता. कोपर आणि गुडघे यांच्यातील कोरडेपणा कसा कमी करता येईल ते जाणून घेऊया.

हा पॅक बनवा आणि लावा

जर कोपर आणि गुडघ्यांची त्वचा कोरडी आणि खडबडीत झाली असेल, तर मध, दूध आणि कोरफड जेल यांचे मिश्रण तयार करून ते गुडघे आणि कोपरांवर लावा. ही पेस्ट लावल्यानंतर 20 ते 25 मिनिटे सुकू द्या. यानंतर, तुमच्या हातात थोडेसे दूध घेऊन या त्वचेवर मसाज करा आणि नंतर ओल्या स्पंजने स्वच्छ करा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करू शकता.

दही-बेसनाचा पॅक

गुडघे आणि कोपरांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी, दह्यात बेसन, चिमूटभर हळद मिक्स करा तयार पॅक त्वचेवर लावा. जर टॅनिंग जास्त असेल तर त्यात थोडा लिंबाचा रस टाकून हा पॅक लावू शकता. जर तुम्ही हा पॅक दररोज लावला तर काही दिवसांतच तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.

कोपर आणि गुडघ्याच्या काळजीसाठी टिप्स

तुमच्या हातांचे कोपर आणि पायांच्या गुडघ्याची त्वचा कोरडी, खडबडीत आणि काळी पडू नये म्हणून, नियमित काळजी घेतली पाहिजे.

– सनस्क्रीन लावताना गुडघे आणि कोपरांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा टॅनिंगमुळे तुमची त्वचा काळी पडू लागेल.

– तुमच्या दैनंदिन दिनचर्येत उन्हात बाहेर पडताना तुमचे गुडघे आणि कोपर झाकून ठेवा.

– आठवड्यातून 1-2 वेळा तुमच्या गुडघ्यांच्या आणि कोपरांच्या त्वचेला स्क्रब करत राहा, कारण यामुळे मृत त्वचेच्या पेशी आणि घाण खोलवर साफ होईल.

– सनस्क्रीन लावण्याव्यतिरिक्त तुमच्या गुडघे आणि कोपरांच्या त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका. यासाठी तुम्ही नारळ तेल वापरू शकता.

– ओव्हरनाईट स्किन केअर घेण्याच्या दिनचर्येचा भाग म्हणून तुमच्या कोपर आणि गुडघ्यांवरची त्वचा जाड मॉइश्चरायझरने झाकून ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)