Peri Peri Masala: पेरी – पेरी मसाला घरीच करा तयार, झटपट जाणून घ्या रेसिपी

Peri Peri Masala: अनेक जण पेरी - पेरी मसाला बाहेरून विकत अणतात, पण आता सर्वांना आवडणारा पेरी - पेरी मसला बाहेरुन विकत घेण्याची काहीही गरज नाही. घरीच हा मसाला तयार करता येईल. झटपट जाणून घ्या रेसिपी

Peri Peri Masala: पेरी - पेरी मसाला घरीच करा तयार, झटपट जाणून घ्या रेसिपी
Peri Peri Masala
| Updated on: Nov 22, 2026 | 4:11 PM

Homemade Peri Peri Masala : पेरी पेरी मसाला अनेकांना आवडतो. अनेक जण पेरी – पेरी मसाला बाहेरून विकत अणतात, पण आता सर्वांना आवडणारा पेरी – पेरी मसला बाहेरुन विकत घेण्याची काहीही गरज नाही. कारण आता तुम्हाला घरीच पेरी – पेरी मसाला तयार करता येणार आहे. सांगायचं झालं तर, आजकाल खवय्यांमध्ये पेरी-पेरी मसाला खूप लोकप्रिय झाला आहे. त्याची तुरट, किंचित आंबट आणि तिखट चव कोणत्याही सामान्य पदार्थाला खास बनवते. मूळतः हा मसाला आफ्रिकन बर्ड्स आय मिरचीपासून तयार केला जातो, याचा वापर फ्रेंच फ्राईज, सँडविच, पॉपकॉर्न, पास्ता आणि अनेक प्रकारच्या स्नॅक्समध्ये केला जातो.

पेरी-पेरी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

Loading...

२ मोठे चमचे लाल मिरची पावडर, १ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, १ मोठा चमचा लसूण पावडर, १ चमचा आल्याची पावडर, १ चमचा कांद्याची पावडर, १ चमचा काळी मिरी पावडर, १ चमचा सुका ओरेगॅनो, १ चमचा सुकलेली तुळस, १ चमचा साखर, १ चमचा मीठ. १ चमचा आमचूर पावडर

कसा बनवाल पेरी पेरी मसाला?

सर्वप्रथम, सर्व साहित्य एका स्वच्छ आणि कोरड्या भांड्यात घ्या. आता चमच्याच्या साहाय्याने ते चांगले मिसळा, जेणेकरून सर्व मसाले एकजीव होतील. तयार केलेले मसाले हवाबंद डब्यात साठवून ठेवा. थंड आणि कोरड्या जागी ठेवल्यास ते अनेक आठवडे ताजे राहतील. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता. तसेच, मुलांसाठी बनवताना जास्त काश्मिरी मिरच्या आणि कमी तिखट मिरच्या वापरा.

पेरी-पेरी मसाल्याचे उपयोग

गरम फ्रेंच फ्राईजवर थोडे पेरी-पेरी मसाला लावा. यामुळे त्यांची चव अनेक पटींनी वाढते. चित्रपट पाहताना पॉपकॉर्नमध्ये मिठाऐवजी पेरी-पेरी मसाला वापरा. ​​त्यामुळे एक वेगळी आणि आंबट-गोड चव येईल. स्टफिंगची चव वाढवण्यासाठी हा मसाला सँडविच, बर्गर किंवा रॅपवर शिंपडता येतो. भाजलेल्या बटाट्यांमध्ये, रताळ्यांमध्ये, पनीरमध्ये किंवा इतर भाज्यांमध्ये हा मसाला घातल्याने त्यांची चव अधिकच अप्रतिम लागते. जर तुम्हाला मसालेदार पदार्थ आवडत असतील, तर पास्ता किंवा नूडल्सला एक नवीन चव देण्यासाठी तुम्ही त्यात थोडा पेरी-पेरी मसाला घालू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us