AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Cleaning Tips : फ्रिज उघडताच दुर्गंधी येतेय? शेल्फपासून रबर सीलपर्यंत अशी करा स्वच्छता

फ्रिजमध्ये ठेवलेलं एखादं अन्न खराब झालं, पदार्थ सांडला किंवा जुन्या अन्नाचे कण शेल्फमध्ये राहिले तर दुर्गंधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे वास घालवण्याआधी त्याचं मूळ कारण शोधणं महत्त्वाचं आहे.

Kitchen Cleaning Tips :  फ्रिज उघडताच दुर्गंधी येतेय? शेल्फपासून रबर सीलपर्यंत अशी करा स्वच्छता
kitchen cleaning tips Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 7:21 PM
Share

फ्रिज उघडताच त्यातून विचित्र वास येतोय? फ्रिजमध्ये भाजी, फळं,दूध शिजवलेले जेवण अशा अनेक गोष्टी एकत्र ठेवल्या जातात. त्यामुळे एखादा पदार्थ खराब झाला किंवा ग्रेव्ही सांडली किंवा एखादी वस्तू तशीच पडून राहिली तर त्याचा वास संपूर्ण फ्रिजमध्ये पसरू शकतो. अनेकदा फ्रिज साफ केल्यानंतरही हा वास लगेच जात नाही. अशावेळी काही सोप्या उपायांनी फ्रिजमधील दुर्गंधी कमी करता येते.

सर्वात आधी खराब झालेले अन्न फेकून द्या

सर्वात महत्त्वाच म्हणजे एकदा फ्रिज तपासा, नेमका वास कुठून येतोय ते जाणून घ्या. वास येणारा पदार्थ, खराब झालेला पदार्थ लगेच बाहेर काढा.एखादी वस्तू बराच काळ फ्रिजमध्ये पडून राहिल्यास ति सडते.फ्रिजमध्ये थंडावा जरी असला तरी काही कारणाने केव्हा केव्हा वस्तू सडते.

बेकिंग सोडा ठरेल उपयोगी

फ्रिजची साफसफाई केल्यानंतर दुर्गंधी कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करता येतो. एका वाटीत किंवा डब्यात बेकिंग सोडा घेऊन तो फ्रिजच्या शेल्फवर ठेवा. कारण बेकिंग सोडा फ्रिजमधील वास खेचून घेतो. मात्र यासाठी आधी फ्रिजची स्वच्छता करणं तितकंच महत्त्वाचं असतं.

शेल्फ आणि ड्रॉअरही स्वच्छ करा

फक्त फ्रिजमधील खराब पदार्थ बाहेर काढून होत नाही. शेल्फ ड्रॉअर आणि त्यांच्या कोपऱ्यांमधेही अन्नाचे छोटे कण किंवा पदार्थ सांडलेले असतात. त्यामुळे कोमट पाणी आणि थोड डिशव़ॉश घेऊन मऊ कपड्याने किंवा स्पंजने हे भाग स्वच्छ करा. त्यानंतर व्यवस्थित कोरडे करा.

फ्रिजच्या दरवाज्याची रबर सील विसरू नका

फ्रिजच्या दरवाजाभोवती असलेल्या रबर सीलमध्येही धूळ आणि घाण जमा होते. हे रबर स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात माईल्ड डिर्जंट मिसळा आणि मऊ कपड्याने पुसा.

लिंबामुळेही वास कमी होण्यास मदत होईल

फ्रिज साफ केल्यानंतरही हलका वास राहिला असेल तर लिंबाचा वापर करता येतो.लिंबाच्या रसात कपडा भिजवून शेल्फ पुसू शकता. तसेच लिंबाचे काही तुकडे छोट्या वाटीत ठेवून काही तास फ्रिजमध्ये ठेवता येतात. यामुळे दुर्गंधी कमी होते.

कॉफी पावडरचा वापर

फ्रिजमधील वास कमी करण्यासाठी वापरलेली कॉफी पावडर एका छोट्या उघड्या वाटीत ठेवता येतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या कॉफीमुळे उरलेला वास कमी होण्यास मदत होऊ शकते.

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!