AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Tips : चाकूची धार गेली? नवा चाकू आणण्याआधी हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

रोजच्या वापरामुळे किचनमधील चाकूची धार कमी होणे सामान्य आहे. नवा चाकू घेण्याआधी घरच्या घरी धार तपासण्यापासून ते शार्प करण्यापर्यंतच्या सोप्या पद्धती जाणून घ्या. चाकूला धार लावताना जास्त जोर देणे किंवा वारंवार कोन बदलणे टाळा. घरच्या घरी चाकू धारदार करण्याच्या सोप्या पद्धती आणि कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या.

Kitchen Tips : चाकूची धार गेली? नवा चाकू आणण्याआधी हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
fruits cutting knife Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 7:31 PM
Share

किचनमध्ये रोज भाजी, फळं किंवा इतर पदार्थ कापण्यासाठी वापरला जाणारा चाकू काही काळाने बोथट होतो, म्हणजेच त्याची धार निघून जाते. त्यामुळे मऊ फळ किंवा भाज्या कापताना नाकी नऊ येतात, मग आपल्याला बाजारातून नवा चाकू आणा रे अश्या आईच्या किचनमधून मागण्या ऐकू येतात. पण प्रत्येक वेळी नवा चाकू आणायची लीगरज नाही. काही सोप्या टिप्समुळे तुम्ही घरच्या घरी चाकूला छान धार लावू शकता.

चाकूची धार कमी झाली आहे हे कसं ओळखायचं

चाकूची धार तपासण्यासाठी कागदाचा वापर करता येतो. कागद सरळ करून तो चाकूने कापून पाहा.चाकू सहज कागद कापत असेल तर चाकूची धार व्यवस्थित आहे. मात्र कागद फाटत असेल किंवा चाकू मधेच अडकत असेल तर धार कमी झालेली असू शकते. याशिवाय तुम्ही पिकलेल्या टोमॅटोवरही चाकू फिरवून पाहू शकता. टोमॅटोवर जास्त दाब न देता टोमॅटो सहज कापला जात असेल तर धार चांगली आहे. पण जास्त दाब घ्यावा लागला तर धार गेली आहे असे समजून जा.

शार्पनिंग स्टिलचा वापर

चाकूची धार थोडी गेली असेल तर शार्पिनिंग स्टील उपयोगी ठरू शकते. यामुळे चाकूचे नुकसान न होता चाकूची धार व्यवस्थित होईल. चाकू साधारण २० अंशाच्या कोनात ठेवून ब्लेड हळूहळू स्टिलवरून चालवा.यामुळे चाकू छान धारदार होईल.

व्हेटस्टोनने चाकूला धार द्या

चाकू खूपच बोथट झाला असेल किंवा धार कायमची गेली असेल तर व्हेटस्टोन म्हणजेच शार्पनिंग स्टोनचा वापर करता येतो. चाकू साधारण 20 ते 30 अंशाच्या कोनात ठेवून ब्लेड हळूहळू स्टोनवरून फिरवा. दुसऱ्या बाजूने देखील हिच पद्धत वापरा .

सिरेमिक कपचा वापर

घरात शार्पनिंग टूल नसेल तर सिरेमिक कपचा वापर करून धार करू शकता. कप उलटा ठेवा आणि त्याच्या तळाशी असलेल्या खडबडीत भागावर चाकूची धार सावधपणे फिरवा.

मॅन्युअल शार्पनर ठरेल सोपा पर्याय

चाकू पटकन धारदार करायचा असेल तर मॅन्युअल शार्पनर वापरता येतो. शार्पनरमधील स्लॉटमध्ये चाकूचे ब्लेड ठेवून हलक्या हाताने मागच्या दिशेने ओढा. रोजच्या वापरातील चाकूला धार करण्यासाठी हा सोपा पर्याय मानला जातो.

सँडपेपरचा वापर

गरज पडल्यास सँडपेपरचा वापरही करता येतो.मीडियम ते फाइन ग्रिटचा सँडपेपर सपाट लाकडी ब्लॉकवर ठेवा. त्यावर चाकू साधारण 20 अंशाच्या कोनात ठेवूम दोन्ही बाजूंनी हळूहळू फिरवा.

चाकूला धार लावताना या चुका टाळा

चाकू धारदार करताना खूप जोर लावू नका. जास्त दाबामुळे धार असमान होते. त्यामुळे हात घसरण्याता धोका वाढतो. चाकूचा कोन शक्यतो सारखाच ठेवा. चुकूनही कोन बदलल्यास चाकूला व्यवस्थित धार येणार नाही.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय