AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cleaning Tips : बाथरूमच्या टाईल्सवरचे हट्टी पिवळे डाग काढण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोपे क्लिनिंग हॅक्स

पाणी, साबण आणि सततचा ओलावा यामुळे बाथरूमच्या टाईल्सवर पांढरे डाग, साबणाचे थर आणि घाण जमा होऊ शकते. योग्य पद्धतीने नियमित साफसफाई केल्यास टाईल्स स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

Cleaning Tips : बाथरूमच्या टाईल्सवरचे हट्टी पिवळे डाग काढण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोपे क्लिनिंग हॅक्स
bathroom cleaning tips Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 6:38 PM
Share

बाथरूम रोज वापरलं जातं, त्यामुळे तिथल्या टाईल्सवर पाणी , साबण आणि ओलाव्यामुळे हळूहळू डाग जमा होतात. काही दिवसांनी नव्या कोऱ्या टाईल्सचाही रंग फिका दिसू लागतो त्याची चमक कमी होते. पण ते पाण्याचे पांढरे डाग, साबणाचे डाग, टाईल्सच्या फटिंमधील घाण साफ कशी करावी असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो.अशावेळी डाग घालवण्यासाठी कोणत्याही कठीण केमिकल किंवा हार्ड स्क्रबरचा करण्याची गरज नसते. उलट यामुळे बहुतेकदा टाईल्सचा रंगच निघून जातो.काही सोप्या पद्धती वापरून टाईल्स स्वच्छ ठेवता येतात.

बाथरूम वापरल्यानंतर लवकरात लवकर कोरडे करा

बाथरूममध्ये सतत ओलावा असल्यामुळे टाईल्सवर फंगस आणि मोल्ड वाढण्याची शक्याता असते. त्यामुळे बाथरूम वापरल्यानंतर जमिनीवर साचलेलं पाणी शक्यतो लगेच पुसून घ्या. यासाठी मॉप किंवा मायक्रोफायबर कपड्याचा वापर करा. यामुळे ओलावा कमी राहिल आणि फंगसमुळे डाग पडणार नाही.

आठवड्यातून एकदा व्यवस्थित सफाई करा

फक्त पाणी पुरेस नसतं. आठवड्यातून किमान एकदा टाईल्सची व्यवस्थित सफाई करा. यासाठी माईल्ड टाईल क्लिनर आणि कोमट पाणी वापरता येईल. टाईल्स घासण्यासाठी सॉफ्ट ब्रश किंवा स्पंज वापरा. टोकदार स्क्रबर वापरल्यास टाईल्सवर ओरखडे पडू शकतात आणि त्याची फिनिशिंग कायमची खराब होऊ शकते.

टाईल्सच्या भेगांमध्ये घाण खूप लवकर साचते

टाईल्सच्या मधल्या भेगांमध्ये घाण पटकन साचते. ही जागा स्वच्छ करण्यासाठी जुन्या टुथब्रशचा वापर करता येतो. जुन्या आणि छोट्या टुथब्रशने भेगांमध्ये घासल्यावर घाण सहज निघून जाण्यास मदत होते. घाण जास्त चिकट असेल तर बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट करून त्या भागावर चोळा. घाण झटक्यात गायब होईल.

पाण्याचे पांढरे डाग काढण्यासाठी व्हिनेगर

हार्ड वॉटरमुळे टाईल्सवर पांढरे डाग पडत असतील तर पाणी आणि पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करता येतो. यासाठी एक चमचा व्हिनेगर आणि तीन चमचे पाण्याचे मिळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण टाइल्सवर हलकं स्प्रे करून सुमारे पाच मिनिटं ठेवा. त्यानंतर सॉफ्ट कपड्याने पुसा आणि स्वच्छ पाण्याने टाइ्ल्स धुवा. मात्र व्हिनेगर प्रत्येक प्रकारच्या टाइल्ससाठी योग्य असेलचं असं नाही. त्यामुळे आधी एखाद्या छोट्या आणि न दिसणाऱ्या भागावर चाचणी घेणं चांगलं.

जिद्दी डागांसाठी बेकिंग सोडा

टाइल्सवर साबणाची पुटं किंवा हट्टी डागं असतील तर बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवता येतं. ही पेस्ट डागावर लावून काही वेळ ठेवा. त्यानंतर सॉफ्ट स्पंजने हलक्या हाताने साफ करा आणि पाण्याने धुवून घ्या. शेवटी मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या.

या चुका केल्यात तर टाईल्सची चमक कायमची निघुन जाईल

टाइल्स स्वच्छ करताना स्टिल वूल, खूप खडबडीत स्क्रबर किंवा अतिशय स्ट्राँग केमिकल वापरणं टाळा. यामुळे टाइल्सवर ओरखडे पडू शकतात आणि त्यांची फिनिश खराब होऊ शकते. ब्लीच किंवा अमोनियासारखी मजबूत रसायने वापरताना उत्पादनावर दिलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे.

Follow Us
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?