कानाच्या समस्या दूर करण्यासाठी इअरग्रिट इअरड्रॉप्स किती प्रभावी आहे? पतंजलीच्या संशोधनात काय आढळले?

कान हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. कानाचं काम केवळ ऐकनं एवढंच नाही तर शरीराच्या संतुलनामध्ये देखील कानाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र आजच्या काळात कानाशी संबंधित समस्यांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे.

कानाच्या समस्या दूर करण्यासाठी इअरग्रिट इअरड्रॉप्स किती प्रभावी आहे? पतंजलीच्या संशोधनात काय आढळले?
patanjali
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 8:54 PM

कान हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. कानाचं काम केवळ ऐकनं एवढंच नाही तर शरीराच्या संतुलनामध्ये देखील कानाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र आजच्या काळात कानाशी संबंधित समस्यांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. बदललेली जीवनशैली, हेड फोनचा अति वापर, कानाची योग्य पद्धतीने स्वच्छता न करणे, ही काही याची मुख्य कारणं आहेत.WHO च्या एका रिपोर्टनुसार जगातील सुमारे 5 टक्के लोक कानाच्या कोणत्या न कोणत्या समस्येमुळे त्रस्त आहेत. कानाच्या उपचारासाठी अनेक जण ॲलोपॅथीचे उपाय करतात. मात्र कानाच्या उपचारावर आयुर्वेदामध्ये देखील अनेक उपाय आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर पतंजली आयुर्वेद लिमिटेडने ईअरग्रीट ईअरड्राप आणि ईअरग्रीट गोल्ड टॅबलेट्स विकसित केल्या आहेत.

पतंजिलीच्या रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ईअरग्रीट ईअरड्राप आणि ईअरग्रीट गोल्ड टॅबलेट्स या कानाच्या अनेक समस्यांमध्ये रामबाण इलाज आहेत. यासोबतच या संशोधनामध्ये असं देखील आढळून आलं आहे की, कानांच्या पेशींवर जर सूज निर्माण झाली असेल तर ती देखील यामुळे कमी होऊ शकते. रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, पतंजलीचा ईअर ड्रॉप आणि टॅबलेट्स कानाच्या दुखण्यापासून तर इन्फेक्शनपर्यंत उपयोगी आहे. पतंजलीच्या सिसर्चमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, या ईअर ड्रॉप आणि टॅबलेट्सचा कोणताही साइड इफेक्ट्स नाहीये. हा ड्रॉप्स आणि टॅबलेट्स कानातील खतरनाक बॅक्टेरियावर हल्ला करतात आणि कानातील बॅक्टेरिया नष्ट करतात. तसेच पेशींवर जर सूज आली असेल तर ती देखील यामुळे कमी होते.

आयुर्वेदिक वनस्पतींपासून निर्मिती

पतंजलीने केलेल्या दाव्यानुसार ईअरग्रीट ईअरड्रॉप हा मेथी, कडू लिंब, धोत्रा, तुळस, भृंगराज, हळद आणि अन्य औषधी वनस्पतीपासून तयार करण्यात आला आहे. याचं मुख्य वैशिष्ट म्हणजे या ड्रॉपमध्ये तेलाऐवजी ग्लिसरीन वापरण्यात आलं आहे. त्यामुळे हा ड्रॉप थंडीमध्ये गोठत नाही. तसेच ईअरग्रीट गोल्ड टॅबलेट्स या गिलॉय, आवळा, लवंग, अर्जून या सारख्या वनस्पतीपासून बनवण्यात आल्या आहेत. हे दोन्ही प्रोडक्स पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवण्यात आले आहेत.

जागतिक आरोग्य संस्थेच्या एका रिपोर्टनुसार 2050 पर्यंत प्रत्येक दहा व्यक्तीमागे एकाला कानाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. मात्र चिंताजनक बाब ही आहे की, लोक जर कानाशी संबंधित काही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करतात. जोपर्यंत दुखणं वाढत नाही तोपर्यंत त्यावर कोणताही इलाज केला जात नाही. काही काही प्रकरणात तर जोपर्यंत कानाने कमी ऐकयला येत नाही, तोपर्यंत या समस्येकडे लोक दुर्लक्ष करतात.

कानाची रचना कशी असते?

बाह्य कान (External Ear)

हा कानाचा तो भाग असतो जो बाहेरून तुम्हाला दिसू शकतो.

मध्य कान (Middle Ear)

ही एक छोटी पोकळी असते, ज्यामध्ये तीन सर्वात लहान हाडे असतात. हा भाग युस्टाचियन ट्यूबद्वारे घशाशी जोडलेला असतो

आतील कान (Internal Ear)

या भागाची रचना ही गोगलगायीसारखी असते, हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण यीथेच ध्वनी लहरींचे रुपांतर विद्युत सिग्नलमध्ये होऊन ते सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवले जातात. या तीनही भागांमध्ये तुम्हाला कुठेही दुखापत झाली असेल किंवा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम हा तुमच्या श्रवण शक्तीवर होतो.

जर ऐकायला कमी येत असेल तर काय कराल?

जर एखाद्या व्यक्तीला नीट ऐकू न येण्याची समस्या असेल तर अशा व्यक्तीला डॉक्टर शुद्ध स्वर ऑडिओमेट्री टेस्ट करण्याचा सल्ला देतात. या चाचणीचे मापण हे डेसीबलमध्ये होते. सामान्यपणे ज्या व्यक्तीला कानाची कोणतीही समस्या नसेल अशा व्यक्तीला 0 ते 30 डेसीबलपर्यंतचा आवाज सहज ऐकू जातो. परंतु जर एखाद्या व्यक्तीला श्रवणदोष असेल तर अशा व्यक्तीला 35 डेसिबलचा आवाज देखील नीट ऐकू येत नाही, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर योग्य उपचारांचा किंवा ऑपरेशनचा सल्ला देतात.

ऐकू न येण्याची कारणं काय?

जर कानात इन्फेक्शन झालं असेल तर

जास्त प्रमाणात ईअरफोनचा वापर

कानात मळ साठणे

वाढतं वय

डोक्याला मार लागणे

Follow Us