GK: चिकट टेपचे किती प्रकार आहेत, कोणता टेप कुठे वापरायचा? 99 टक्के लोकांना माहिती नाही
Tape : एखादी वस्तू जोडण्यासाठी किंवा काहीतरी चिकटवण्यासाठी आपल्याला चिकट टेपची आवश्यकता असते. आज आपण टेपचे किती प्रकार आहेत आणि त्याचा वापर कुठे केला जातो याची माहिती जाणून घेऊयात.
आपल्या सर्वाच्या घरी चिकट टेप असतो. एखादी वस्तू जोडण्यासाठी किंवा काहीतरी चिकटवण्यासाठी आपल्याला चिकट टेपची आवश्यकता असते. तसेच गिफ्ट पॅक करण्यासाठी, इलेक्ट्रिक कामासाठीही टेपचा उपयोग केला जातो. प्रत्येक कामासाठी वेगवेगळा टेप असतो हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आज आपण टेपचे किती प्रकार आहेत आणि त्याचा वापर कुठे केला जातो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
टेपचे प्रकार आणि वापर
- दररोज वापरला जाणारा टेप – आपल्या सर्वांच्या घरी पारदर्शक स्कॉच टेप असतो असतो. आपण याचा वापर किरकोळ कामासाठी केला जातो. हा हलका आणि पारदर्शक टेप कागद चिकटवण्यासाठी किंवा तात्पुरत्या वस्तू नीट करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच दररोजच्या वापरात मॅजिक टेपचा देखील उपयोग केला जातो.
- मजबूत आणि विशेष टेप – बाजारात काही मजबूत आणि टिकाऊ टेप मिळतात. यातील एक म्हणजे डक टेप, जो कापड किंवा रबर जोडण्यासाठी वापरला जातो. हा टेप वॉटर प्रुफ आहे. घराचे छत, पाईप किंवा जड वस्तू जोडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
- पेंटिंग आणि डेकोरेशन साठी लागणार टेप – या कामासाठी मास्किंग टेप आणि पेंटर्स टेप वापरले जातात. पेंटिंग केल्यानंतर हा टेप सहज काढता येतो, यामुळे भींतीवर खुणा दिसत नाहीत. तसेच वाशी टेप डेकोरेशन साठी वापरला जातो. यात रंगीत आणि सुंदर डिझाइन असतात.
- इलेक्ट्रिकल आणि पॅकेजिंग टेप्स – इलेक्ट्रिकल कामासाठी वापरण्यात येणारा टेप पीव्हीसीपासून बनलेला असतो. हा टेप तारांना इन्सुलेट करण्यासाठी तसेच उष्णता आणि आर्द्रतेपासून संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. पॅकेजिंग आणि ई-कॉमर्समध्ये बीओपीपी ब्राउन टेप वापरला जातो. हा टेप मजबूत आणि टिकाऊ असतो.
- मेडिकल आणि इंडस्ट्रियल टेप – उद्योग आणि आरोग्यसेवेत वेगळे टेप वापरले जातात. मेडिकल आणि सर्जिकल टेप्स हायपोअलर्जेनिक अॅडेसिव्हसह बनवला जातो, ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. तसेच प्लंबिंगमध्ये पाणी किंवा गॅस गळती रोखण्यासाठी पीटीएफई किंवा टेफ्लॉन थ्रेड सील टेप वापरला जातो.
- मॉडर्न आणि हाय टेक टेप – बाजारात फोम असलेला डबल-साइडेड टेप आणि नॅनो जेल टेप मिळतो. हे टेप पुन्हा वापरता येतात. तसेच अॅक्रेलिक फोम आणि व्हीएचबी टेप इतके मजबूत आहेत की ते स्क्रू किंवा वेल्डिंगसारखे मजबूत असू शकतात.