AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना पाय ना हात, तरी साप कसे तयार करतो बिळ, त्यांचं घर कोण तयार करतं? वाचून व्हाल चकित!

Snake Fact : साप हे असे जीव आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे घर बांधण्याची शारीरिक क्षमता नसते. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडतो की तो बीळ कसे तयार करतो? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

ना पाय ना हात, तरी साप कसे तयार करतो बिळ, त्यांचं घर कोण तयार करतं? वाचून व्हाल चकित!
Snake Hole Image Credit source: AI
| Updated on: May 03, 2026 | 7:33 PM
Share

साप पाहतात अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण सापांबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. घरात, बागेत किंवा इतर ठिकाणी साप दिसला की लोक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करू लागतात. अनेकदा बागेत किंवा घराजवळ दिसणाऱ्या कोणत्याही छिद्राला सापाचे बिळ समजले जाते, पण विज्ञानाच्या दृष्टीने हे सत्य नाही. प्रत्यक्षात साप हे असे जीव आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे घर बांधण्याची शारीरिक क्षमता नसते. कारण त्यांच्याकडे उंदरांसारखे माती उकरण्यासाठी नखं नसतात. मग त्यांचे घर नेमके कोण बनवते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इतरांच्या घरांवर कब्जा

साप हा इतर जीवांच्या घरांवर कब्जा करणारा प्राणी आहे. बहुतांश साप राहण्यासाठी उंदीर, खार किंवा इतर लहान प्राण्यांनी केलेल्या बिळांच्या घरात शिरतात आणि तिथे राहणाऱ्या प्राण्यांना आपले भक्ष्य बनवतात. त्या प्राण्याची शिकार केल्यानंतर तेच रिकामे झालेले बिळ आपले नवीन घर बनवतात. अशा प्रकारे त्यांना एकाच वेळी अन्न आणि तयार घर मिळते.

वाळवीच्या घरांवरही कब्जा

सापांचे आणखी एक आवडते ठिकाण म्हणजे वाळवीने बनवलेले वारुळ. वाळवी हा प्राणी माती आणि लाळेच्या साहाय्याने अतिशय मजबूत आणि थंड घर तयार करतात. साप या वारुळांमधील भेगांचा फायदा घेऊन आत शिरतात. ही घरं खोल आणि तापमान स्थिर ठेवणारी असल्यामुळे साप उन्हाळा आणि हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी यात शिरतात आणि बरेच दिवस मुक्काम करतात.

नैसर्गिक फटी आणि जुनी झाडे

साप घर निवडताना फक्त प्राण्यांची बिळेच नव्हे, तर जुन्या इमारतीतील फटी, दगडांमधील मोकळी जागा आणि जुन्या झाडांच्या पोकळ खोडांमध्ये शिरून आश्रय घेतात. सापांच्या शरीराची रचना इतकी लवचिक असते की ते अतिशय अरुंद जागेतही सहज राहू शकतात. सापांसाठी ही ठिकाणे केवळ शिकाऱ्यांपासून संरक्षण देत नाहीत, तर प्रजननासाठी सुरक्षित वातावरणही उपलब्ध करून देतात. त्यामुळे साप या ठिकाणी राहणे पसंत करतात.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!