कंसीलर आणि फाऊंडेशन डॉट डॉट करून का लावलं जातं?

मेकअपशी संबंधित अशा अनेक गोष्टी असतात की मेकअप लावल्याने तुमचा चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसतो. यापैकी एक नियम म्हणजे कंसीलर आणि फाऊंडेशन डॉट-डॉट करून लावणे.

कंसीलर आणि फाऊंडेशन डॉट डॉट करून का लावलं जातं?
Foundation makeup
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2023 | 6:42 PM

आजच्या काळात मेकअप करणं सर्वांनाच आवडतं. म्हणूनच लोक रोज नवनवीन मेकअप लूक रिक्रिएट करताना दिसतात. तसं तर मेकअपचा एकच नियम नाही. पण मेकअपशी संबंधित अशा अनेक गोष्टी असतात की मेकअप लावल्याने तुमचा चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसतो. यापैकी एक नियम म्हणजे कंसीलर आणि फाऊंडेशन डॉट-डॉट करून लावणे. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की मेकअप लावताना कंसीलर आणि फाऊंडेशन डॉट डॉट करून लावलं जातं. तुम्हाला माहित आहे का असं का केलं जातं? तसे नसेल तर आज आम्ही तुम्हाला फाऊंडेशन आणि कंसीलर अशा पद्धतीनं का लावलं जातं याचं कारण सांगणार आहोत.

अनेकदा आपण ते घाईत एकाच वेळी बरंच उत्पादन वापरून टाकतो, ही मोठी चूक आहे. अशा वेळी कंसीलर आणि फाऊंडेशन डॉट-डॉट लावल्यास चूक होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच तुमच्या वेळेचीही बरीच बचत होते.

पैशांची बचत

मेकअप उत्पादने बाजारात खूप महाग आहेत, विशेषत: ब्रँडेड आणि चांगल्या गुणवत्तेची. यामुळे तुमच्या पैशांचीही बचत होते. त्वचेत मेकअप योग्य पद्धतीने मिसळणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे आपला चेहरा सुंदर किंवा कुरूप दिसतो. अशावेळी चेहऱ्यावर कंसीलर आणि फाऊंडेशन डॉट-डॉट करून लावल्यास ते सहज मिसळतात.

नैसर्गिक फिनिशिंग

आजच्या काळात मेकअप केल्यानंतरही आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार दिसावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशावेळी जर तुम्ही कोणतेही लिक्विड मेकअप प्रॉडक्ट डॉट-डॉट करून लावले तर ते तुम्हाला नॅचरल फिनिश देते.