कोळसा, सोप स्टोन, विटेचा चुरा, मसाल्यात होणारी भेसळ कशी ओळखाल?

| Updated on: Dec 17, 2020 | 3:56 PM

कुठल्या मसाल्यात भेसळ झाली आहे हे कसं ओळखावं हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

कोळसा, सोप स्टोन, विटेचा चुरा, मसाल्यात होणारी भेसळ कशी ओळखाल?
spices
Follow us on

मुंबई : आजकाल खाण्याच्या वस्तूंमध्ये भेसळ करण्यात येत आहे (How To Check Genuine Spices), अशी तक्रार अनेकांना असते. वारंवार वृत्तपत्रात याबाबत बातम्या येत असतात. कुठे तिखटात विटेचा चुरा तर धण्यात मध्ये हिरवं गवताची भेसळ होत असते. मात्र, मसाल्यात भेसळ करुन तुमच्या आरोग्याचा खेळ खंडोबा केला जात आहे (How To Check Genuine Spices).

अशा परिस्थितीत कुठल्या मसाल्यात भेसळ झाली आहे हे कसं ओळखावं हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

हळद

हलक्या रंगाच्या हळदीला अधिक पिवळं बनवण्यासाठी त्यामध्ये रंग, माक्याचं पीठ इत्यादी मिसळण्यात येतं. शुद्ध हळदीची ओळख पटवण्यासाठी एका पेल्यात पाणी घ्या आणि त्यात एक चमचा हळद मिसळा. जवळपास 20 मिनिटांनंतर हळद पेल्याच्या तळाला बसेल आणि पाणी स्वच्छ दिसेल. तर समजा तुमची हळद चांगली आहे. जर रंग पाण्यात दिसला तर समजा की तुमच्या हळदीत भेसळ झाली आहे.

तिखट

तुमच्या घरी येणारं तिखट हे भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी एका पेल्यात पाणी घ्या. त्यामोध्ये एक चमचा तिखट मिसळा. जर पाण्याचा रंग बदलला तर समजा की त्यात भेसळ आहे आणि जर पाण्याचा रंग लाल झाला नाही तर तुमचं तिखट भेसळयुक्त नाही. तसेच, जर पाण्यात खाली पांढऱ्या रंगाचं काही दिसत असेल तर त्यात सोप स्टोन मिसळण्यात आले आहे. जर तिखटात विटेचा चुरा मिसळला असेल तर पेल्याच्या खाली तेही तुम्हाला दिसेल

जिरे

भेसळयुक्त जिरे ओळखण्यासाठी जिरे हातावर घेवून चोळा, जर तुमच्या हातावर लाल रंग लागला तर समजा की यामध्ये भेसळ करण्यात आली आहे. त्याशिवाय, जिरे पावडरला पाण्यात मिसळा, जिरे पावडर पाण्यात मिसळतं. जर तुम्हाला पाण्याच्या वरच्या भागावर काही तरंगताना दिसत असेल तर समजा त्यात भेसळ झाली आहे (How To Check Genuine Spices).

बडीशेप

बडीशेपमध्ये जर रंग मिसळला असेल तर पाण्यात मिसळ्याने तो लगेच कळतो. बडीशेपची चाचणी केल्यावरही त्यातील भेसळीची माहिती मिळती. बडीशेपमध्ये जर अल्कोहोल मिसळली असेल तर ती जास्त ताजी दिसते.

लवंग

लवंगमध्ये जास्तकरुन सुगंभ मिसळला जातो आणि जुन्या लवंगा नवीन लवंग म्हणून विकल्या जातात. चांगली लवंग कुठली आहे हे माहीत करुम घेण्यासाठी सर्वात आधी लवंग पाण्यात टाकून बघा. यापैकी ज्या जुन्या लवंगा असतील त्या तळाला बसतील आणि नवीन लवंगा पाण्यावर तरंगतील.

How To Check Genuine Spices

संबंधित बातम्या :

सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये होणार बदल, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?

International Tea Day | भारतात चहाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या तुमच्या चहाचा रंजक इतिहास

Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!