सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये होणार बदल, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?

सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये आता बदल होणार आहेत.

सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये होणार बदल, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 9:54 PM

नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये आता बदल होणार आहेत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‌ॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI ने मोठं पाऊल टाकलं आहे. सरकारच्या या आदेशानुसार आता नवीन मेन्यूकार्डमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना अन्नाची न्यूट्रीशन व्हॅल्यू (पोषण मूल्य) लिहावी लागणार आहे. (FSSI rules Hotel restaurant Food labelling)

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जे पदार्थ बनवले गेले त्यामध्ये किती कॅलरीज आहेत, याचीही नोंद मेन्यूकार्डमध्ये अनिवार्य केली गेली आहे. जे लोक कॅलरीजच्या प्रमाणानुसार खातात त्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कॅलरीव्यतिरिक्त हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अन्नातील पोषक तत्त्वांचा उल्लेखही मेन्यूकार्डमध्ये करणं आवश्यक असेल. पोषण तत्वानुसार कोणता पदार्थ शरीरासाठी चांगला असेल, याचा लोकांना एकंदरित अंदाज येईल.

लोकांना काय फायदा

आतापर्यंत आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मेन्यू कार्डमध्ये केवळ पदार्थाचं नाव आणि त्याची किंमत एवढंच नमूद केलेलं असायचं. मात्र आता संबंधित पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत आणि पोषण तत्वे कोणती आहेत, याची माहिती मेन्यू कार्डवर असणार आहेत. यामुळे लोकांना जेवढ्या कॅलरीजचं जेवण खायचं असेल तेवढ्याच कॅलरीज जेवण ते खाऊ शकतील किंबहुना ऑर्डर करु शकतील. लोकांना पहिलंच जर कॅलरीजविषयी कळालं तर त्यांना पाहिजे तेवढ्या कॅलरीज जेवण करता येणं, सोपं होईल.

भारत सरकारने ठरविलेल्या या नियमात सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्स येणार नाहीत. आत्ता हा नियम फक्त त्या रेस्टॉरंट्सवर लागू होईल ज्यांच्या 10 हून अधिक साखळ्या आहेत. वास्तविक, या नियमाची मागणी बर्‍याच काळापासून मागणी केली जात होती जेणेकरुन लोक पैसे खर्च करुन हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात तर त्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नाची हमी मिळायला हवी.

(FSSI rules Hotel restaurant Food labelling)

संबंधित बातम्या

International Tea Day | भारतात चहाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या तुमच्या चहाचा रंजक इतिहास

Skin Care | त्वचेच्या आरोग्यासाठी ‘व्हिटामिन ए’युक्त आहार महत्त्वाचा, डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ घटक!

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.