Skin Care | त्वचेच्या आरोग्यासाठी ‘व्हिटामिन ए’युक्त आहार महत्त्वाचा, डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ घटक!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Dec 15, 2020 | 10:36 AM

त्वचेच्या आरोग्यासाठी ‘व्हिटामिन ए’ युक्त आहार अतिशय महत्त्वाचा ठरतो. यासाठीच आपण आपल्या आहारात ‘व्हिटामिन ए’ युक्त पदार्थांचा समावेश करावा.

Skin Care | त्वचेच्या आरोग्यासाठी ‘व्हिटामिन ए’युक्त आहार महत्त्वाचा, डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ घटक!
सुंदर आणि डाग रहित त्वचेसाठी घरी असा तयार करा साखर स्क्रब

मुंबई : आहार योजना अर्थात डाएट प्लान बनवताना आपण बर्‍याचदा केवळ शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देतो, परंतु त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आतील सौंदर्य नेहमी बाह्य सौंदर्यापेक्षा महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे सर्वात महत्वाचे आहे, ज्याचा आपल्या त्वचेवर परिणाम झाला पाहिजे. अशा वेळी त्वचेच्या आरोग्यासाठी ‘व्हिटामिन ए’ युक्त आहार अतिशय महत्त्वाचा ठरतो. यासाठीच आपण आपल्या आहारात ‘व्हिटामिन ए’ युक्त पदार्थांचा समावेश करावा. ‘व्हिटामिन ए’ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे (Vitamin A Food For Healthy Skin).

‘व्हिटामिन ए’मध्ये रेटिनॉल असते, जे त्वचेच्या पेशी वाढवण्याचे काम करते. तसेच त्यात बीटा ऑक्सिडेंट असतात, जे त्वचेतील कॅलेजेन वाढवण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त, ‘व्हिटामिन ए’ सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते.

टोमॅटो

टोमॅटो हा ‘व्हिटामिन ए’चा मुख्य स्त्रोत मानला जातो. आपण सर्वच रोजच्या आहारात, भाजीत टोमॅटो वापरतो. याशिवाय, टोमॅटो सूप आणि चटणी बनवूनही ‘व्हिटामिन ए’चे सेवन करू शकता.

गाजर

गाजर ही एक भाजी आहे, जी भारतीय खाद्यपदार्थांसह आंतरराष्ट्रीय पदार्थांमध्ये देखील वापरली जाते. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटामिन ए’ असते. म्हणूनच गाजराचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर ठरते (Vitamin A Food For Healthy Skin).

अंड्याचा बलक

अंड्यातील पिवळा बलक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ‘व्हिटामिन डी’ व्यतिरिक्त अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटामिन ए’ देखील असते. अंडी आपल्या आरोग्यासाठी आणि तब्येतीसाठी खूप लाभदायी असतात.

भोपळा

भोपळ्यामध्ये कॅरोटीनोइड अल्फा कॅरोटीन असते, जे शरीरात ‘व्हिटामिन ए’मध्ये रूपांतरित होते. भोपळा देखील आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे.

लाल शिमला मिरची

पिझ्झा, पास्ता आणि सलाडमध्ये लाल शिमला मिरची वापरली जाते. लाल शिमला मिरची आपल्या जेवणाची चव आणखी वाढवते. हिरव्या शिमला मिरची बाजारात सहज उपलब्ध होतात. परंतु, हिरव्या प्रमाणेच लाल शिमला मिरची देखील आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.

(Vitamin A Food For Healthy Skin)

टीप : ही फक्त प्राथमिक माहिती आहे. वरील गोष्टी प्रत्यक्षात करण्यापूर्वी आरोग्य सल्लागार तसेच इतर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI