Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? अंघोळीनंतर लावा या 4 गोष्टी, त्वचा राहील मऊ अन् चमकदार

वातावरणात हळूहळू गारवा जाणवू लागला असून थंडीला सुरुवात झाली आहे. थंड हवामानामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशावेळी अंघोळीनंतर चेहऱ्याला काही गोष्टी लावल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? अंघोळीनंतर लावा या 4 गोष्टी, त्वचा राहील मऊ अन् चमकदार
Winter Skin Care
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 12, 2026 | 10:45 AM

हिवाळ्याला सुरुवात झाली की वातावरणात हळूहळू गारवा वाढू लागतो. थंड वारे आणि कमी आर्द्रतेचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. या दिवसांत त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी, रूक्ष आणि निस्तेज दिसू लागते. अनेकदा चेहऱ्यावरील नैसर्गिक चमकही कमी होते. अशा वेळी त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. विशेषतः आंघोळीनंतर त्वचा किंचित ओली असतानाच मॉइश्चरायझर लावल्यास ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी घरातील काही नैसर्गिक गोष्टींचाही वापर करता येतो. तूप, दुधाची साय, खोबरेल तेल यांसारख्या गोष्टी त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. जाणून घेऊया आंघोळीनंतर त्वचेवर कोणत्या गोष्टी लावाव्यात.

तूप वापरा

हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुपाचा वापर करू शकता. तुपातील स्निग्ध घटक त्वचा मऊ ठेवण्यास आणि ओलावा टिकवण्यास मदत करतात. यासाठी थोडेसे तूप घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. मात्र, ऑइली स्किन असेल तर हे वापरताना काळजी घ्या.

Loading...

दुधाची साय लावा

दुधाची साय त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करते. थोडीशी साय घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही सायीमध्ये थोडे एलोवेरा जेल मिसळूनही लावू शकता.

खोबरेल तेल लावा

खोबरेल तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. आंघोळीनंतर हातावर थोडेसे तेल घेऊन चेहरा आणि शरीराच्या कोरड्या भागांवर हलक्या हाताने लावा. खोबरेल तेलाऐवजी मोहरीचे तेलही वापरू शकता. मात्र, चेहऱ्यावर तेल लावण्यापूर्वी ते त्वचेला सूट होते का, हे तपासा.

बदामाचे तेल आणि गुलाबपाणी

एक चमचा गुलाबपाण्यात बदामाच्या तेलाचे पाच थेंब मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. बदामाचे तेल त्वचेचा ओलावा टिकवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होऊ शकते.

त्वचेची काळजी घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात आंघोळीसाठी खूप गरम पाण्याचा वापर टाळा. शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करा. आंघोळीनंतर त्वचा पूर्णपणे कोरडी होण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावा. तसेच दिवसभर पुरेसे पाणी प्या. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us