पांढरे दात मिळवण्यासाठी काय करायचं? घरगुती सोपे उपाय

जर तुम्ही रोज ब्रश करत असाल आणि तरीही तुमचे दात स्वच्छ नसतील तर तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे तुमचे दात मोत्यासारखे चमकतील. चला तर मग आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही दात पिवळसर होण्यापासून सुटका मिळवू शकता.

पांढरे दात मिळवण्यासाठी काय करायचं? घरगुती सोपे उपाय
White teeth
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 19, 2023 | 5:11 PM

मुंबई: फर्स्ट इम्प्रेशन हे नेहमी लास्ट इम्प्रेशन असतं. अशावेळी इम्प्रेशन तयार करण्यात दात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे दात स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे कारण हसता-हसता तुमचे दात समोरच्या व्यक्तीला दिसू लागतात. जर तुम्ही रोज ब्रश करत असाल आणि तरीही तुमचे दात स्वच्छ नसतील तर तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे तुमचे दात मोत्यासारखे चमकतील. चला तर मग आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही दात पिवळसर होण्यापासून सुटका मिळवू शकता.

दात स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आपल्याला दातांमध्ये चमक आणण्यास मदत करू शकतो. ते वापरण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोड्यात चिमूटभर मीठ घाला. यानंतर हे मिश्रण ब्रशमध्ये लावून दात हलकी मसाज करा. जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या दातांची चमक वाढेल.

व्हिनेगरची मदत घ्या

दात स्वच्छ करायचे असतील तर तोंडाचा वास दूर करण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करू शकता. सकाळी ब्रश केल्यानंतर पांढरा व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून तोंड स्वच्छ धुवावे. असे केल्याने तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासूनही मुक्ती मिळेल.

स्ट्रॉबेरीचा वापर करा

दातांना चमक आणण्यासाठीही स्ट्रॉबेरीचा वापर करता येतो. त्यासाठी आधी स्ट्रॉबेरी मॅश करा. आता त्यात चिमूटभर मीठ घाला. त्यानंतर त्यानं दात स्वच्छ करा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)