Sandwich Recipe: मुलांसाठी झटपट बनवा टेस्टी चीज ग्रील्ड सँडविच, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे रेसिपी
Snacks Recipe for Kids: मुलांना संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी तुम्ही घरीच कमी वेळात चीजने भरलेले ग्रिल्ड सँडविच बनवू शकता. मुलांच्या इव्हनिंग स्नॅक्ससाठी ही सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा.

संध्याकाळी भूक लागल्यानंतर मुलांना नेहमी काहीतरी चटपटीत आणि वेगळे खायला हवे असते. सँडविच, बर्गर यांसारखे पदार्थ तर मुलांच्या विशेष आवडीचे असतात. अशावेळी रोज मुलांसाठी नवीन काय बनवायचे, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. तुम्हालाही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एखादी सोपी आणि चविष्ट रेसिपी हवी असेल, तर चीज ग्रील्ड सँडविच हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ब्रेड, चीज आणि काही मोजक्या पदार्थांपासून हे सँडविच अगदी कमी वेळात तयार करता येते. विशेष म्हणजे लहान मुलांसोबतच घरातील मोठ्यांनाही हा टेस्टी स्नॅक्स नक्की आवडेल. चला तर मग, जाणून घेऊया चीज ग्रील्ड सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.
चीट ग्रील्ड सँडविच बनवण्यासाठी साहित्य
– ब्रेड ४ स्लाइस
– टोमॅटो १ चिरलेला
– कांदा १ चिरलेला
– बटाटा १ उकळलेला
– काकडी १ चिरलेली
– कोथिंबीर १ टीस्पून
– काळी मिरी पावडर १/२ टीस्पून
– चाट मसाला १/२ टीस्पून
– बटर १/२ टीस्पून
– चीज २ चमचे
– मीठ चवीनुसार
चीज ग्रील्ड सँडविच बनवण्याची पद्धत
मुलांसाठी चीज ग्रील्ड सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडवर चीज लावा. मुलांना आवडत असेल तर तुम्ही चीज लावण्यापूर्वी हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस सुद्धा लावू शकता. आता त्यावर कांदा, टोमॅटो, काकडी, बटाट्याचे स्लाईल ठेवा. यावर थोडे मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला शिंपडा. आता दुसऱ्या ब्रेड स्लाईसवर चीज, हिरवी चटणी, सॉस लावून ही स्लाईस त्यावर ठेवा. आता सँडविच ग्रील गरम करा. आता ब्रेडवर बटर लावून सँडविच ग्रीलमध्ये ठेवा. आता सँडविच दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ग्रील करा. तुमचे टेस्टी चीज ग्रील्ड सँडविच तयार आहे. टोमॅटो सॉससोबत गरमा गरम सँडविच मुलांना सर्व्ह करा.