चवदार आणि मसालेदार मॅगी भेळ! पटकन वाचा, झटकन तयार करा

तुम्ही कधी मॅगी भेळचा आस्वाद घेतला आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी मॅगी भेळ बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. मॅगी भेळ चवीला खूप मसालेदार आणि कुरकुरीत असते. स्नॅकमध्ये पटकन बनवून संध्याकाळची भूक शांत करू शकता

चवदार आणि मसालेदार मॅगी भेळ! पटकन वाचा, झटकन तयार करा
Maggie bhel
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 05, 2023 | 6:19 PM

मॅगी हा एक खाद्यपदार्थ आहे जो लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे लहान मुले आणि मोठ्यांनाही मॅगी खाण्याचे वेड लागले आहे. मॅगीची खास गोष्ट म्हणजे ती बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. म्हणूनच आजवर तुम्ही भरपूर मसाला मॅगी किंवा साधी मॅगी खाल्ली असेल. पण तुम्ही कधी मॅगी भेळचा आस्वाद घेतला आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी मॅगी भेळ बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. मॅगी भेळ चवीला खूप मसालेदार आणि कुरकुरीत असते. स्नॅकमध्ये पटकन बनवून संध्याकाळची भूक शांत करू शकता, तर चला जाणून घेऊया मॅगी भेळ कशी बनवायची.

मॅगी भेळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 पॅकेट मॅगी
  • 1 वाटी भाजलेले शेंगदाणे –
  • 1 चीज क्यूब
  • 1/2 अर्धा कांदा
  • 1/2 काकडी
  • 1 टोमॅटो
  • 2 हिरवी मिरची
  • 1/2 गाजर
  • 1 चमचा कोथिंबीर
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून मॅजिक मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 1 टीस्पून रेड चिली सॉस
  • 1 टीस्पून टोमॅटो सॉस

मॅगी भेळ कशी बनवायची?

  • मॅगी भेळ बनवण्यासाठी आधी मॅगीला क्रश करा.
  • मग एका कढईत लोणीचा तुकडा टाकून वितळवा.
  • यानंतर त्यात मॅगी घालून साधारण १० मिनिटे तळून एका बाऊलमध्ये बाहेर काढा.
  • नंतर कांदा, गाजर, काकडी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर अशा सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात.
  • त्यानंतर भाजलेल्या मॅगीमध्ये टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस १-१ चमचा घालून मिक्स करावे.
  • नंतर भाजलेले शेंगदाणे, मीठ, मॅगी मसाला आणि लाल तिखट घाला.
  • यासोबतच त्यात सर्व चिरलेल्या भाज्या घालून नीट मिक्स करा.
  • आता चवदार आणि मसालेदार मॅगी भेळ तयार आहे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. झी न्यूज ने याला दुजोरा दिलेला नाही.)