वयाची पन्नाशी गाठतांनाही कसे दिसणार तरुण ? रवीना टंडनचा हा ‘सिक्रेट डाएट’ करेल तुमची मदत!

| Updated on: Aug 13, 2022 | 6:26 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर ती तिच्या फिटनेससाठीही खूप प्रसिद्ध आहे. वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल सुरु असताना ४७ व्या वर्षीही रवीना आजच्या काळातील तरुण अभिनेत्रींना सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसते. जाणून घ्या, काय आहे रवीना टंडनचा सिक्रेट डाएट, ज्यामुळे तिचं वय कळणे कठीण जातं.

वयाची पन्नाशी गाठतांनाही कसे दिसणार तरुण ? रवीना टंडनचा हा ‘सिक्रेट डाएट’ करेल तुमची मदत!
Follow us on

नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री पैकी प्रसिद्ध एक रवीना टंडन ही अभिनेत्री आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Actress Raveena Tandon) केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर ती तिच्या फिटनेससाठीही खूप प्रसिद्ध आहे. ‘टीप-टीप बरसा पानी’ मधील तिच्या ‘डान्स-स्टेप’ अजूनही लोकांना वेड लावण्यासाठी पुरेशा आहेत. आता रवीना टंडन ४७ वर्षांची झाली आहे आणि तिच्या फिटनेसमुळे (Because of fitness) ती, आजच्या तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देते. रवीना टंडन वयाच्या ४७ व्या वर्षीही इतकी तरुण आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय खाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हालाही वयाच्या ४७ व्या वर्षी तरुण आणि तंदुरुस्त दिसायचे असेल तर जाणून घेऊया रवीनाच्या फिटनेसचे रहस्य (The secret to fitness) आणि ती अजूनही इतकी सुंदर आणि फिट कशी दिसते.

रविनाचे तरुण दिसण्याचे काय आहे रहस्य

रवीनाने सांगितले की, तिला तिच्या मुलांसोबत घराच्या टेरेसवर वर्कआउट करायला आवडते आणि ती वर्कआउटसाठी जिममध्ये जात नाही. याशिवाय रवीनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती भरपूर फळे आणि प्रोबायोटिक्स खाते, ज्यामुळे तिचे वय खूपच तरुण दिसते. रवीनाने सांगितले की, दह्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि लॅक्टिक अॅसिड, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स आढळतात ज्यामुळे त्वचेचे कोलेजन वाढण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. तसेच, दही आणि फळे रोगप्रतिकार शक्ती आणि चयापचय वाढवण्यास मदत करतात.

रवीनाचा काय आहे आहार?

रविना म्हणते की, तिला अनेक गोष्टी मिसळून खायला आवडते. तसेच, ती कोणत्याही प्रकारचे अन्न खाणे टाळत नाही. जरी ती तिच्या रोजच्या आहारात साधी मसूर, भजी, रोटी आणि दही समाविष्ट करते. रवीनाला दही खूप आवडते आणि ती म्हणते की दही पोट थंड ठेवण्याचे काम करते आणि पचनासही मदत करते.

मॅजिक टॉनिक

रवीनाने तिच्या सिक्रेट घरगुती काढा रेसिपी देखील शेअर केली आहे, जी तिने कोरोना महामारीच्या काळात प्यायला सुरवात केली होती. हा घरगुती काढा बनवण्यासाठी रवीना तिच्या शेतातील सेंद्रिय हळद, लवंगा, आले, काळी मिरी, ओवा(अजवाईन) आणि थोडे तूप वापरते. हे टॉनिक रवीनाला केवळ सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवत नाही, तर तिचे वजनही नियंत्रणात ठेवते.

रवीनाला चीज आणि बटर आवडते

रवीना टंडनने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला चीज आणि बटर खूप आवडते. मात्र, ती या गोष्टी कमी प्रमाणातच खाते.

पोहण्याचा छंद

रवीनाला स्वीमिंग, योगा आणि कार्डिओ करायला आवडते आणि ती हे सर्व तिच्या घरी राहून करते. सोशल मीडियावरही रवीनाने योगा करतानाचे तिचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.

काय आहे रवीना चे चीट मील

रवीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला तिच्या आईच्या हातची दूध बर्फी आवडते. जे तूप, साखर आणि खव्यापासून बनवले जाते. या बर्फीसाठी ती तिचे डाएट ही मोडते.