तुम्हालाही हवेत कंबरेपर्यंत लांब अन् जाड केस; मग नारळ तेलाऐवजी हे तेल वापरा, काही दिवसातच रिझल्ट मिळतील

लांब, जाड आणि चमकदार केस हे महिलांचे स्वप्न असते. मात्र रोजच्या धावपळीच्या आयुष्यात केसांची निगा राखणे तेवढे जमत नाही. पण यावार एक रामबाण उपाय म्हणजे एक जादुई तेल. होय, नारळाचे तेल तर केसांसाठी उपयुक्त असतेच पण त्याहीपेक्षा हे एक तेल वापरा आणि काही दिवसांमध्येच त्याचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील.

तुम्हालाही हवेत कंबरेपर्यंत लांब अन् जाड केस; मग नारळ तेलाऐवजी हे तेल वापरा, काही दिवसातच रिझल्ट मिळतील
If you also want long and thick hair up to your waist, then try using mustard oil
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Oct 04, 2025 | 6:16 PM

प्रत्येक मुली आणि महिलेला लांब, जाड आणि चमकदार केस नक्कीच आवडतात. त्यासाठी कित्येक महिला महागड्या पार्लर ट्रीटमेंट, शॅम्पू आणि कंडिशनर, क्रिम, तेल असं बरच काही वापरत असतात. कारण धावपळीची जीवनशैली, खराब आहार, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा वापर यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.

जादुई तेलाचा वापर केल्याने तुमचे केस मुळांपासून मजबूत होतात

पण महागडे ट्रीटमेंट, शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुढे जाऊन केसांची पोत खराब होते. त्यामुळे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले तेल, मास्क केसांच्या वाढीसाठी नेहमीच प्रभावी मानले जाते कारण ते केसांना आतून पोषण देते आणि कोणतेही नुकसान करत नाही. त्यासाठी नाराळाचे तेल तर चांगलेच आहे पण त्याहीपेक्षा जास्त उपयुक्त हेअर ऑईल म्हणजे मोहरीचे तेल. होय, मोहरीचे तेल, वापरल्याने केसांची वाढ जलद होण्यास मदत होते. या जादुई तेलाचा वापर केल्याने तुमचे केस मुळांपासून मजबूत होतात आणि केसांची गळती थांबते,केस तुटणे कमी होते तसेच केसांची वाढ जलद गतीने होते.

लांब केसांसाठी मोहरीचे तेल इतके महत्त्वाचे का आहे?

प्राचीन काळापासून केसांची काळजी घेण्यासाठी मोहरीचे तेल वापरले जात आहे. त्यात असे पोषक घटक असतात जे केसांना मजबूत करतात आणि रक्ताभिसरण वाढवतात. बरं हे तेल नुसतेच लावण्यापेक्षा त्यात जर काही गोष्टी त्यात मिसळल्या तर अजून चांगल्या प्रकारे केस वाढण्यास मदत होते.

हे तेल बनवायचे कसे?

मिली मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळा

10 ग्रॅम जिरे
10 ग्रॅम ओवा
10 ग्रॅम मेथीचे दाणे
10 ग्रॅम काळी मिरी

आणि काही थेंब लैव्हेंडर अरोमा ऑइलचे टाकू शकता

मोहरीचे जादूचे तेल कसे बनवायचे?

1 प्रथम, लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात 100 मिली मोहरीचे तेल घाला.
2 त्यात १० ग्रॅम अमरबेल घाला आणि ते जळून काळे होईपर्यंत चांगले शिजवा.
3 आता त्यात सेलेरी, मेथीचे दाणे आणि काळी मिरी घाला आणि चांगले तळा.
4 सर्व साहित्य जळून तेलात चांगले मिसळल्यावर, आग बंद करा.
5 तेल थंड होऊ द्या आणि नंतर ते गाळून वेगळे करा.
6 शेवटी, त्यात लव्हेंडर किंवा कोणतेही अरोमा ऑयलचे काही थेंब वापरावे

हे तेल कसे आणि किती वेळा वापरावे?

1 आठवड्यातून दोनदा हे तेल लावा.
2. झोपण्यापूर्वी तुमच्या टाळूला हलक्या हाताने मालिश करा.
3. दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शाम्पूने तुमचे केस धुवा.

या तेलाचे फायदे?

1 केसांच्या मुळांना पोषण देते.
2 केस गळणे कमी करते.
3 केसांची वाढ जलद करते.
4 केसांना मजबूत आणि मऊ बनवते.
5 केसांना नैसर्गिक चमक देते.