Myntra बिग फॅशन फेस्टिव्हलची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी 1.4 कोटी वस्तूंची खरेदी

| Updated on: Dec 07, 2020 | 1:30 PM

फेस्टिव सिझनमध्ये शॉपिंग वेबसाईटवर मोठ्या संख्येने ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे (Myntra big fashion festival).

Myntra बिग फॅशन फेस्टिव्हलची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी 1.4 कोटी वस्तूंची खरेदी
Follow us on

मुंबई : फेस्टिव सिझनमध्ये शॉपिंग वेबसाईटवर मोठ्या संख्येने ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे (Myntra big fashion festival). या दरम्यान आता मिंत्रा या ई कॉमर्स वेबसाईटने बिग फॅशन फेस्टिवलचे आयोजन केले आहे. यामध्ये मिंत्राला देशभरातील दुकानदारांपेक्षा सर्वाधिक प्रतिक्रिया मिळत आहे. या धमाकेदार फॅशन फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवशी 1.4 कोटींच्या वस्तूंची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 100 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. मिंत्रा बिग फेस्टिवल 22 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे (Myntra big fashion festival).

आतापर्यंत 15 लाख ग्राहकांनी येथून खरेदी केली आहे. 45 लाखांच्या वस्तूंची विक्री मिंत्रावरुन झाली आहे. पहिल्याच दिवशी लहान मुलांच्या पोशाखातील 150 टक्के कपड्यांची विक्री झाली आहे. ब्यूटी आणि पर्सनल केअरच्या वस्तूंच्या विक्रीमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हा फेस्टिव सीझन 16 ऑक्टोबर रात्री 12 पासून सुरु झाला आहे. 20 लाख लोकं हा फेस्टिव्ह सुरु होण्यासाठी वाट पाहत होते. आतापर्यंतचा सर्वात मोठा फेस्टिव्ह इव्हेंट हा आहे.

बारा तासात लाखो लोकांकडून खरेदी

“आमच्या बिग फॅशन फेस्टिव्हलची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या बारा तासामध्ये 12 लाख लोकांनी खरेदी केली आहे. मिंत्रामधील हा सर्वात मोठा फेस्टिव्ह समजला जात आहे. बिग फॅशन फेस्टिव्हमध्ये दोन लाख नवीन ग्राहकांसह आम्हाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही खूश आहे”, असं मिंत्राचे सीईओ अमर नागराम यांनी सांगितले.

नागराम म्हणाले, “यावरुन स्पष्ट होत आहे की, फेस्टिव्ह सीझनमध्ये सर्वात चांगले, सुविधाजनक आणि खरेदीसाठी सुरक्षित अनुभवासाठी आमचा प्लॅटफॉर्म ग्राहकांना योग्य वाटला”.

सेल दरम्यान मिंत्रा अॅपमध्ये पन्नास लाख डाऊनलोडर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फेस्टिव्ह दरम्यान पहिल्याच दिवशी 50 लाख वेळा मिंत्रा अॅप डाऊनलोड करण्यात आला.

या फेस्टिव्ह दरम्यान 60 लाख ग्राहक असे आहेत. ज्यांच्याद्वारे तीन कोटी प्रोडक्ट्स शॉर्ट लिस्टेड केले गेले. अॅथनिक विअर कलेक्शनमध्येही यावेळी गेल्यावर्षीच्या तुलनेत 100 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

35 लाख कूपनचे वाटप

या फेस्टिव्हमध्ये महिलांच्या वेस्टर्न विअर आणि पुरुषांच्या जीन्स आणि स्ट्रीटविअरने सर्वात पहिली जागा घेतली आहे. पहिल्या तासात लिबासच्या लाईम ग्रीन आणि ब्लू प्रिंटेड कुर्ता आणि प्लाजोची सर्वाधिक विक्री झाली. या दरम्यान महत्त्वाचे म्हणजे मिंत्राने 35 लाख कूपन्स वाटले.

या फेस्टिव्ह इव्हेंटमध्ये लिबास, विशुद्ध आणि एच अँड एमसारख्या महिलांचे ब्रँड टॉपवर आहेत आणि पुरुषांचे रोडस्टर, हायलँडर आणि प्युमासारखे ब्रँड्स टॉपवर आहेत.