तुम्हालाही स्काय डायव्हिंगचे वेड आहे का? भारतातील ‘ही’ 4 ठिकाणे नक्की करा एक्स्प्लोअर

स्काय डायव्हिंगचा रोमांचक अनुभव आणि आनंद फक्त परदेशातच मिळतो असं नाही. आता हाच आनंद आणि अनुभव तुम्हाला आपल्या भारतात घेता येणार आहेत. कारण आता ॲडव्हेंचर प्रेमींसाठी भारतातही अशी काही खास ठिकाणे आहेत. जिथे जाऊन तुम्ही मनसोक्त स्काय डायव्हिंग करू शकतात. यासाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही. चला तर मग तुम्हाला या खास ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात...

तुम्हालाही स्काय डायव्हिंगचे वेड आहे का?  भारतातील ही 4 ठिकाणे नक्की करा एक्स्प्लोअर
स्काय डायव्हिंग
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 2:59 PM

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. त्यातच प्रवास हा आता सामान्यत: लोकांच्या मनोरंजनाचा भाग झाला आहे. आजकाल लोकं वर्षातून दोन ते तीन वेळा सुट्टयांचे नियोजन फिरायला जाण्याचे करत असतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये अनेकांना विविध प्रकारचे ॲडव्हेंचर करायला आवडतात. त्यातच तुम्हाला थ्रिल आणि ॲडव्हेंचरचे वेड असेल तर स्काय डायव्हिंग हा तुमच्यासाठी एक परिपूर्ण अनुभव असू शकतो. कारण हजारो फूट उंचीवरून हवेत उडी मारणे आणि नंतर मोकळ्या आकाशात काही क्षण हवेत तरंगणे, हे कोणत्याही ॲडव्हेंचर प्रेमीचे स्वप्न असते. आणि हेच ॲडव्हेंचरचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तुम्ही या सुट्टीत परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. स्काय डायव्हिंग आता भारतात वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे आणि ते अनुभवण्यासाठी येथे अनेक उत्तम ठिकाणे आहेत.

तुम्हालाही तुमच्या सुट्टीला ॲडव्हेंचर करण्यासाठी खास करायचे असेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. येथे तुम्ही पूर्ण सुरक्षितता आणि प्रोफेशनल ट्रेनिंगसह ट्राय करू शकता. भारतातील सर्वात रोमांचक स्काय डायव्हिंग ठिकाणांबद्दल जाणून घेऊया…

पाँडिचेरी

तुम्हालाही समुद्रकिनाऱ्यावर स्काय डायव्हिंगचा आनंद घ्यायचा आहे का? तर पाँडिचेरीला जा. येथे तुम्हाला समुद्राच्या सुंदर दृश्यांसह स्काय डायव्हिंगचा अनुभव घेता येणार आहे. ज्यांना निसर्गासोबतच ॲडव्हेंचरचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. तुम्ही नोव्हेंबर ते मार्च पर्यंत येथे जाऊ शकता. येथे तुम्ही 10 हजार फूट उंचीवर स्काय डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात.

बिर बिलिंग

हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग हे भारताची पॅराग्लायडिंग राजधानी म्हणून ओळखले जाते. हे स्काय डायव्हिंग तसेच इतर अनेक ॲडव्हेंचरच्या खेळांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. ॲडव्हेंचर प्रेमी आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे.

डीसा

डीसा शहर तलावाच्या काठावर वसलेले आहे. हे गुजरातमधील सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. गुजरात क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय पॅराशूटिंग फेडरेशन येथे अनेक स्काय डायव्हिंग कॅम्प आयोजित करतात. पण इथे स्काय डायव्हिंग करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात.

अ‍ॅम्बी व्हॅली

जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही अ‍ॅम्बी व्हॅलीमध्ये स्काय डायव्हिंग करू शकता. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे अम्बी व्हॅलीमध्ये तुम्हाला 10 हजार फूट उंचीवरून टँडम उडी मारण्यास भाग पाडले जाते. येथे, उडी मारताना, दोन लोक एकत्र डायव्हिंग करतात आणि संपूर्ण वेळ एकमेकांशी बांधलेले राहतात.