
उन्हाळ्याच्या दिवसात गरम वातावरणामुळे घराबाहेरील झाडे कोमजुन जातात. तसेच काही झाडे सुकतात सुद्धा यामुळे याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. कारण रोज ताजी आणि उमलेली फुलांचे रोप पाहून आपली सकाळ सकारात्मक होते. त्यात उन्हाळ्यात आपल्या घरामध्ये सुंदर आणि सुगंधित फुलांची रोपे लावल्यास घर अधिक आकर्षक आणि प्रसन्न दिसते. अशातच फुले केवळ घराला आकर्षक बनवत नाहीत तर त्यांचा सुगंध तुमचा मूड देखील फ्रेश करतो. तसेच घरातील छोट्या बाल्कनित बागकामामुळे मानसिक शांती देखील मिळते. घरातील अशी रोपे देखील आहेत ज्यांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते आणि ती घरात वाढवता येतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमची खोली, हॉल आणि बाल्कनी फुलांनी भरायची असेल, तर या लेखात अशा फुलांच्या रोपांबद्दल जाणून घेऊया जे तुम्ही घराच्या आत कुंड्यांमध्ये सहजपणे लावू शकता.
घर आकर्षक दिसण्यासाठी लोकं त्यांच्या खोली आर्टिफिशियल फुलांनी सजवतात, पण जर घरात खरी फुले लावली तर सौंदर्य द्विगुणित होते आणि तुम्हाला निसर्गाच्या जवळचा अनुभवही मिळेल. चला तर मग आजच्या या लेखात तुम्ही घरात कोणत्या फुलांचे रोप लावू शकता त्याबद्दल जाणून घेऊयात.
तुम्ही तुमच्या घरात एक पीस लिलीचे रोप लावू शकता, ज्याला एक-पानांची पांढरी फुले येतात. हे पाहायला खूप सुंदर दिसतात. घर सजवण्यासाठी आणि वातावरण चांगले करण्यासाठी हे एक उत्तम फुलांचे रोप आहे.
ही अशी वनस्पती आहे ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होते. कमी सूर्यप्रकाशात ते सहज वाढते. तुम्ही हे रोप तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवू शकता जिथे दिवसातून एकदा सूर्यप्रकाश मिळतो.
जर फुलांचा गुच्छ बनवला आणि त्यात ऑर्किड फुलेही असतील तर ती पाहून मन आनंदी होते. तुम्ही तुमच्या घरीही ऑर्किड लावू शकता. त्याच्या काही प्रजाती खूप कमी सूर्यप्रकाशात किंवा सूर्यप्रकाशाशिवाय घरांच्या वातावरणात ते रोप राहते. फक्त त्यांना थोड्याशा प्रकाशात ठेवण्याची गरज आहे.
हे रोप खूप सुंदर दिसते आणि तुमच्या घराचे सौंदर्य वाढवू शकते. ऑक्सॅलिक वनस्पतीची पाने जांभळ्या रंगाची आणि त्रिकोणी आकाराची असतात, जी अगदी फुलासारखी दिसतात. त्याच वेळी, त्यावर लहान फुले देखील उमलतात जी खूप सुंदर दिसतात. तुम्ही ते तुमच्या घरात सूर्यप्रकाशाशिवाय किंवा खूप कमी सूर्यप्रकाशात सहजपणे लावू शकता.
तुम्ही तुमच्या घरात लिपस्टिक प्लांट (एस्किनॅन्थस रेडिकन्स) देखील लावू शकता. हे रोप खूप कमी सूर्यप्रकाशातही वाढते. हे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट सुर्यप्रकाश येत नाही. खरं तर, त्याच्या फुलांचा आकार असा आहे की त्याला लिपस्टिक प्लांट म्हणतात.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)