आपण खात असलेल्या मिठाईंवरील चांदीचा फॉइल हा मांसाहारी असतो? काय आहे सत्य?

दिवाळीत मिठाईच्या दुकानांमध्येही लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची मिठाई खरेदी करत आहेत. यामध्ये अनेक मिठाईंवर चांदीचा वर्कवाला पेपर हा असतोच असतो. पण अनेकांना हा चांदीचा वर्कवाला पेपर शाकाहारी आहे का असा प्रश्न पडतो? काय आहे याचे सत्य जाणून घेऊयात.

आपण खात असलेल्या मिठाईंवरील चांदीचा फॉइल हा मांसाहारी असतो? काय आहे सत्य?
Is silver foil paper on sweets non-vegetarian What is the truth behind this
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2025 | 2:01 PM

दिवाळी सणासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. खरेदीसाठी, कपड्यांसाठी तसेच दिवे, सजावटीचे सामान घेण्यासाठी बाजारांमध्ये लोकांची गर्दी आहे. सर्वजन दिवाळीचे जय्यत तयारी करताता. या सर्व खरेदीसोबतच प्रत्येकजण खरेदी करतात ती मिठाईची. आपल्या घरच्यांपासून ते मित्रमैत्रिणींपर्यंत , ऑफिसमध्ये, तसेच शेजारी, नातेवाईक सर्वांना देण्यासाठी मिठाईंचे बॉक्सच्या बॉक्स खरेदी केले जातात. त्यात आपण पाहिलं असेल की आता सर्वच मिठाईंवर फॉईल पेपर लावलेला असतो. त्यामुळे मिठाई आकर्षकही दिसते. मिठाईंना शाही आणि चमकदार स्वरूप येते, आणि या मिठाई एखाद्या लक्झरी भेटवस्तूसारख्या दिसतात.

चांदीचा फॉइल शाकाहारी असतो का?

पण अनेकदा प्रश्न पडतो की हा चांदीचा फॉइल शाकाहारी असतो का? कारण अशा बऱ्याच अफवा आहेत की या चांदीच्या वर्कमध्ये प्राण्यांची चरबी असते. त्यामुळे हे चांदीचे वर्क खाण्यायोग्य असतात का? आणि ते शाकाहारी असतात का? या चिंतेमुळे बरेच लोक चांदीच्या फॉइल असलेल्या मिठाई टाळतात. या मागिल सत्य काय आहे? जाणून घेऊयात.

चांदीचे वर्क म्हणजे काय?

चांदीचे वर्कहे अतिशय पातळ चांदीचे फॉइल असते. ज्याची जाडी फक्त 0.2 ते 0.8 मायक्रोमीटर असते. ते खाण्यायोग्य असते, पण त्याला विशिष्ट अशी चव नसते.

चांदीच्या फॉइलवर प्रश्न का निर्माण झाले?

पूर्वीपासून वर्क बनवण्याची पद्धत अशी होती की बैल, म्हैस, मेंढी किंवा बकरीसारख्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये किंवा कातडीमध्ये चांदीचा पातळ पत्रा ठेवला जात असे आणि नंतर तो हातोड्याने मारला जात असे.

कारण प्राण्याच्या मऊ त्वचेमुळे चांदी चिकटत नव्हती आणि प्राण्यांच्या चरबीवर ती सहजपणे वेगळी होत असे. तथापि, समस्या अशी होती की आतड्याचा काही भाग चांदीमध्ये मिसळत असे. म्हणून, वर्क मांसाहारी मानला जात असे.

असा अंदाज आहे की 1 किलो वर्क तयार करण्यासाठी 12000 हून अधिक प्राण्यांची आवश्यकता लागते जे की शाकाहारी लोकांसाठी हा एक प्रमुख मुद्दा होता. मंदिरांमध्ये किंवा सणांना देवासाठी या मिठाई प्रसाद म्हणून वापरताना वाद निर्माण झाले.

FSSAI ची कारवाई

2016 मध्ये, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी प्राण्यांच्या अवयवांपासून जसे की आतडे किंवा चामडे यांचा चांदीचे वर्क बनवण्यासाठी वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घातली. शिवाय ते आरोग्यासाठी देखील हानिकारक होते. या प्रक्रियेमुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका असतो आणि शाकाहारी लोकांच्या भावना दुखावल्या जात होत्या.

दिल्ली सरकारने ते लागू केले, परंतु 2018 मध्ये, काही उत्पादकांच्या अपिलानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी उठवली. तथापि, न्यायालयाने म्हटले की ही प्रक्रिया स्वच्छ असली पाहिजे. पण आजकाल बहुतेक चांदीचे वर्क हे यंत्राने बनवलेले असतात. त्यात प्राण्यांचे कोणतेही अवयव नसतात. ते पूर्णपणे शाकाहारी असतात

मिठाईंवरील चांदीचे वर्क आता शाकाहारी आहेत का?

2025 पर्यंत, बाजारात उपलब्ध असलेल्या मिठाईंमधील बहुतेक चांदीचे वर्क हे मशीन-निर्मित असल्याचं म्हटलं जातं. त्यात शुद्ध चांदी असते, कागदावर किंवा मशीनमध्ये ते तयार केले जातात. मोठे ब्रँड आता वर्कला “शाकाहारी प्रमाणित” असे लेबलही त्या मिठाईच्या बॉक्सवर लावतात. विशेषतः दिवाळीसारख्या सणांमध्ये तर याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी सण आणि लोकांच्या भावना दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी असतात.