तुमचा जोडीदार स्वार्थी आहे? या 3 सवयीवरून ओळखा, अन्यथा नात्यामध्ये येऊ शकतात अडचणी

तुमचा देखील जोडीदार नेहमी स्वत:लाच बरोबर समजतो का? या 3 सवयीतून ओळखा. अन्यथा या वागणुकीमुळे नात्यावर होऊ शकतो परिणाम. जाणून घ्या सविस्तर

तुमचा जोडीदार स्वार्थी आहे? या 3 सवयीवरून ओळखा, अन्यथा नात्यामध्ये येऊ शकतात अडचणी
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 01, 2026 | 7:55 PM

प्रत्येक नात्यात मतभेद आणि वाद होणे स्वाभाविक आहे. पती-पत्नीमध्येही कधी ना कधी वाद होतात; मात्र अशा वेळी दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि संवादातून मार्ग काढणे महत्त्वाचे असते.

पण तुमचा जोडीदार प्रत्येक वेळी स्वतःलाच बरोबर समजत असेल, तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असेल किंवा प्रत्येक चुकीचा दोष तुमच्यावर टाकत असेल, तर हे अति-अहंकाराचे संकेत असू शकतात. अशा वर्तनाचा परिणाम हळूहळू वैवाहिक नात्यावर होऊ शकतो.

Loading...

यूट्यूबवरील @DrMayankAgrawal या चॅनेलवर डॉ. मयंक अग्रवाल यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या मते, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्वतःला इतरांपेक्षा अधिक खास, हुशार आणि महत्त्वाचे समजण्याची भावना असू शकते. त्यांना सतत कौतुक आणि प्रशंसा हवी असते. कोणी टीका केली किंवा त्यांच्या मताशी असहमती दर्शवली तर त्या व्यक्तीला राग येऊ शकतो किंवा ती भावनिकरीत्या दुखावली जाऊ शकते.

1. प्रत्येक वादात स्वतःलाच बरोबर ठरवण्याचा प्रयत्न

निरोगी नात्यात पती-पत्नीमध्ये मतभेद झाले तरी दोघेही एकमेकांचे म्हणणे ऐकून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र स्वार्थी किंवा नार्सिसिस्टिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती प्रत्येक वादाला जिंकण्या-हरण्याचा विषय बनवू शकते.

2. तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे

लग्नाच्या नात्यात सुख-दुःख, चिंता आणि मनातील गोष्टी एकमेकांशी मोकळेपणाने बोलता येणे गरजेचे असते. मात्र नार्सिसिस्टिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती जोडीदाराच्या भावनांना पुरेसे महत्त्व देत नाही.

3. प्रत्येक चुकीसाठी तुम्हालाच दोषी ठरवणे

तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊन जोडीदाराशी बोलायला सुरुवात करता; पण चर्चा संपताना माफी मात्र तुम्हालाच मागावी लागते का? असे वारंवार घडत असेल तर त्या नात्यातील संवादाच्या पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नार्सिसिस्टिक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींना स्वतःची चूक मान्य करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे ते शेवटपर्यंत स्वतःलाच योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात.

महत्त्वाची टीप: वरील लक्षणे दिसली म्हणजे एखाद्या व्यक्तीला नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. या विकाराचे निदान केवळ तज्ज्ञ मानसिक आरोग्य व्यावसायिक करू शकतात. सततच्या मानसिक त्रासासाठी समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे योग्य ठरू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us